वळूंची झुंज पोहोचली विहिरीत

By Admin | Updated: August 20, 2014 00:40 IST2014-08-19T22:52:12+5:302014-08-20T00:40:24+5:30

वळूंची झुंज पोहोचली विहिरीत

Bull battles are well in the well | वळूंची झुंज पोहोचली विहिरीत

वळूंची झुंज पोहोचली विहिरीत

गेल्या आठवड्यात येथील विवेकानंदनगर नं. २ मध्ये रात्री ८ वाजेच्या दरम्यान वळूंची झुंज सुरू झाली. दोन तास सुरू असलेली झुंज अखेर एक विहिरीजवळ जाऊन पोहोचली. यात एक वळू थेट विहिरीत पडला, तर एकाने बाहेर उडी मारून पळ काढला. याबाबत माहिती मिळताच गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी विहिरीत पडलेल्या वळूला बोर काढण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. अखेर रात्रीच्या वेळी क्रेन मागवण्यात आली. रात्रीच्या अंधारात या भागातील रहिवाशी पिंटू दाभाडे या युवकाने हिंमत करून विहिरीत उडी मारली व वळू क्रेनच्या साखळीला बांधला. तब्बल दोन तासांनंतर या वळूला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. मनोज गुंदेचा, सचिन कांबळे, इरफान राठोड, योगेश चुनियान, विजय उगले, विजय अहिरे, कुणाल बच्छाव, विकी कातारी यांच्या प्रयत्नांमुळे विहिरीत पडलेल्या या वळूला जीवदान मिळाले. डॉ. धात्रक यांनी या वळूवर उपचार केले.

Web Title: Bull battles are well in the well