अन्नाची शपथ घेणारे अन् मिठी मारणारेच निघाले गद्दार; मंत्री भुसे यांचे नाव न घेता आदित्य ठाकरेंचा घणाघात 

By Suyog.joshi | Published: August 21, 2022 12:30 AM2022-08-21T00:30:06+5:302022-08-21T00:34:38+5:30

मालेगावी संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात रात्री 9.30 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे, म्हणाले, ज्यांच्या  प्रचाराला आलो.

Aditya Thackeray's attack on Minister Bhuse without mentioning the name | अन्नाची शपथ घेणारे अन् मिठी मारणारेच निघाले गद्दार; मंत्री भुसे यांचे नाव न घेता आदित्य ठाकरेंचा घणाघात 

अन्नाची शपथ घेणारे अन् मिठी मारणारेच निघाले गद्दार; मंत्री भुसे यांचे नाव न घेता आदित्य ठाकरेंचा घणाघात 

googlenewsNext

मालेगाव - ज्यांच्यावर प्रेम केलं, ज्यांना मित्र समजलो, ज्यांनी मातोश्रीवर येऊन अन्नाची शपथ  घेतली. त्यांनीच गद्दारी केली, अशी घणाघाती टीका मंत्री दादा भुसे यांचे नाव न घेता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. ते शनिवारी शिवसंवाद यात्रेनिमित्त मालेगावी संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात आयोजित सभेत बोलत होते.

मालेगावी संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात रात्री 9.30 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाकरे, म्हणाले, ज्यांच्या  प्रचाराला आलो. जिंकून आल्यावर मंत्रीपद दिले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. आमच्या घरी येऊन अन्नाचीची शपथ घेतली त्यांनीच पाठीत वार केला. आधी कृषी मंत्री पद होते आता कोणते खाते दिले ते मलाही आठवत नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

राज्यात बेईमानांचे सरकार आले आहे.  तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेम, मंत्रीपदे दिले तरी त्यांचे पद हिसकाऊन चाळीस गद्दाराना काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही वृत्ती भयानक आहे. राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. जिकडे  जायचे तिकडे पण ईडीच्या व  दबावापोटी पक्ष का सोडल्याची टीका ठाकरे यांनी केली. आमदारकीचा राजीनामा द्या. मध्यावधी निवडणुकींना सामोरे जा. 

राज्यात शेतकरी आत्महत्या करताहेत, राज्यात काही भागात  पूरस्थिती आहे. हे निर्लज्ज सरकार काहीच करत नाही. यांचे मंत्री कुठे फिरत नाहीत. महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री हवेत  विमान थांबवतात. मालेगावमध्ये परत येणार असेच प्रेम व आशीर्वाद असू द्या असे आवाहन  ठाकरे यांनी केले. शासन बेकायदेशीर असले तरी आपण शासनाचे नियम पाळू  वेळेवर सभा संपवू. तुमच्या प्रेम व बळावरच पुढे जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले  सभेनंतर मॉर्निंग स्टार चौकात  युवा सेना शाखेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले.त्यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे रवाना झाला. धुळ्याहून मालेगावी येतांना झोडगे, गिरणा पुलावर शिवसैनिक व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. सभेला आमदार नरेंद्र दराडे, प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी , राजाराम जाधव, कैलास तिसगे आदी उपस्थित होते.

Web Title: Aditya Thackeray's attack on Minister Bhuse without mentioning the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.