नाशिक जिल्ह्यातील सातशे बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:04 PM2017-11-30T19:04:14+5:302017-11-30T19:06:43+5:30

नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदार संघात सुमारे साडेतीन हजार बीएलओंची नेमणूक करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात त्यामानाने काम मात्र सुरू झालेले नाही. काही बीएलओंनी प्रामाणिकपणे काम सुरू केल्याने गुरूवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या आहेत, परंतु एकूण साडेसात लाख कुटुंबाना अद्यापही भेटी देण्याचे काम बाकी आहे.

Action-packed sword in seven districts of Nashik district | नाशिक जिल्ह्यातील सातशे बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार

नाशिक जिल्ह्यातील सातशे बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार

Next
ठळक मुद्देमतदार यादी अद्यावतीकरण : काम करण्यास दिला नकारगुरूवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या आहेत

नाशिक : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गंत मतदार यादी अद्यावतीकरण करण्याच्या कामास नकार देणारे तसेच संथ काम करणा-या केंद्रस्तरीय अधिकाºयांवर (बीएलओ) जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने तशाच स्वरूपाची कारवाई जिल्ह्यातील कामचुकार बीएलओंवर करण्याचा विचार निवडणूक शाखेने सुरू केला असून, त्यासाठी सर्व तहसिलदारांना पत्र पाठवून माहिती गोळा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्यांचे अद्यावतीकरणाचा कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून, १५ ते ३० नोव्हेंबर या काळात मतदान केंद्र निहाय बीएलओंची नेमणूक करून त्यांच्याकरवी घरोघरी जाऊन मतदार सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील अपवाद वगळता एकाही विधानसभा मतदार संघात गेल्या पंधरा दिवसात समाधानकारक काम झालेले नाही. बीएलओ म्हणून बहुतांशी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी दैनंदिन शैक्षणिक कामे सांभाळून फावल्या वेळेत प्रत्येक मतदाराच्या घरी जावून माहिती संकलित करण्याचे काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदार संघात सुमारे साडेतीन हजार बीएलओंची नेमणूक करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात त्यामानाने काम मात्र सुरू झालेले नाही. काही बीएलओंनी प्रामाणिकपणे काम सुरू केल्याने गुरूवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या आहेत, परंतु एकूण साडेसात लाख कुटुंबाना अद्यापही भेटी देण्याचे काम बाकी आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलिकडेच घेतलेल्या आढाव्यात ही बाब स्पष्ट झाल्याने निवडणूक शाखेने दहा तहसिलदारांना नोटीसा बजावल्या आहेत, त्यात जे बीएलओ काम करीत नसतील त्यांच्यावरही निवडणूक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मतदार याद्यांचे काम न करणाºया काही बीएलओंवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील काम चुकारांवर कारवाई करता येऊ शकते असे निवडणूक शाखेचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील जवळपास सातशे बीएलओंनी अद्यापही काम सुरू केलेले नाही, त्यांच्यावर प्रामुख्याने कारवाई करण्याचे संकेत निवडणूक शाखेने दिले आहेत.

Web Title: Action-packed sword in seven districts of Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.