अमूर्त शैलीतील चित्रप्रदर्शन

By Admin | Updated: January 23, 2017 00:26 IST2017-01-23T00:26:05+5:302017-01-23T00:26:21+5:30

साधना कलादालन : वडघुले यांची कॅन्व्हास, अ‍ॅक्रॅलिक रंगातील कला

Abstract-style illustrations | अमूर्त शैलीतील चित्रप्रदर्शन

अमूर्त शैलीतील चित्रप्रदर्शन

नाशिक : चित्रकार विलास वडघुले यांच्या अमूर्त शैलीतील चित्रांच्या प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत.
दीपालीनगर येथील साधना कलादालनात भरविलेल्या या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेनेचे शहरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते व दिलीप पब्लिक स्कूलचे संचालक सिद्धार्थ राजघरिया, मुख्याध्यापक चित्रा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. अविनाश वडघुले यांचे हे तिसरे वैयक्तिक चित्रप्रदर्शन असून, त्यांनी विविध आकारात कॅन्व्हासवर अ‍ॅक्रॅलिक कलरचा वापर करून अमूर्त शैलीत अतिशय सुंदर रंगसंगतीच्या कलाकृ ती तयार केला आहे. चित्रकलेबरोबरच शिल्पकला सुद्धा वडघुले यांनी तयार केला असून, त्यामध्ये वेगळेपण जपले आहे. इन्टेरिअल डिझाइनअंतर्गत वडघुले यांनी अनेकांचे बंगले, आॅफिसेस, बँकांचे डिझाइन तयार केले आहेत. सदर चित्रप्रदर्शन २५ जानेवारीपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले ठेवले असल्याचे साधना कलादालनाचे संचालक सुनील पुराणिक सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Abstract-style illustrations