पेठ चेक नाक्यावर १९ लाखांची रोकड जप्त

By श्याम बागुल | Published: April 6, 2019 06:55 PM2019-04-06T18:55:21+5:302019-04-06T18:58:52+5:30

निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली असली तरी, ही मर्यादा ओलांडून उमेदवारांकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. परंतु निवडणूक आयोगाला खर्च सादर करताना तो अगदी कमी दाखविला जातो. अन्य खर्च उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते, नातेवाइकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो.

19 lakh cash seized at Peth check naka | पेठ चेक नाक्यावर १९ लाखांची रोकड जप्त

पेठ चेक नाक्यावर १९ लाखांची रोकड जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देसुरतहून येणाऱ्या गाडीची झडती : आयकर विभागाकडे चौकशी जिल्ह्यांना लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमांवर चेकनाके बसविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदारांना उमेदवारांकडून पैसे व वस्तुंचे वाटप होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्याच्या सीमांवर चेकनाके उभारून येणाऱ्या-जाणा-या वाहनांची तपासणी केली जात असताना शनिवारी पहाटे पेठनजीकच्या पिठुंदी चेकनाक्यावर सुरतहून येणा-या वाहनांची तपासणी केली जात असताना नाशिक पासिंग असलेल्या वाहनात १८ लाख ९० हजार ९७० रुपयांची रोकड संशयास्पद सापडली असून, सदरची रक्कम ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी ती आयकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ही तिसरी घटना असून, तिन्ही प्रकरणात चौकशी सुरू आहे.


निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली असली तरी, ही मर्यादा ओलांडून उमेदवारांकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. परंतु निवडणूक आयोगाला खर्च सादर करताना तो अगदी कमी दाखविला जातो. अन्य खर्च उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते, नातेवाइकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो. मतदारांना पैसे वाटप करणे, दारू व भेटवस्तू देणे आदी कारणासाठी मोठ्या प्रमाणावर हवाला वा अन्य मार्गाने पैसे गोळा करून वाटप केले जातात. ते टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने यंदा प्रत्येक व्यक्तीच्या बॅँक व्यवहारांवर नजर ठेवली असून, एक लाखापेक्षा अधिक रकमेचे हस्तांतरण वा खात्यात जमा झाल्यास त्याची दखल घेतली जात आहे. त्याच धर्तीवर पर राज्य व जिल्ह्यांना लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमांवर चेकनाके बसविण्यात आले आहेत. या चेकनाक्यावर नियुक्त केलेल्या पथकामार्फत जिल्ह्यात प्रवेश करणा-या व बाहेर जाणा-या वाहनांची तपासणी केली जात असताना शनिवारी पहाटे ३.३० वाजता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पेठ येथील पिठुंदी चेकनाक्यावर सुरतहून येणारी क्रेटा कंपनीची कार (क्रमांक एम.एच. १५ जी.आर. ४००७) हिची तपासणी केली असता, त्यात पथकाला १८लाख ९० हजार ९७० रोख रक्कम सापडली. या संदर्भात कारमध्ये बसलेले विनायक भाऊसाहेब खरात व प्रदीप रामदास शेटे (रा. चांदोरी ता. निफाड) या दोघांकडे विचारपूस केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नसल्याने पथक प्रमुख एम. आर. शिंदे यांनी म्हटले आहे. सदरची रक्कम ताब्यात घेण्यात आली असून, अधिक चौकशीसाठी आयकर विभागाला कळविण्यात आले आहे.

Web Title: 19 lakh cash seized at Peth check naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.