सिन्नरमध्ये विषबाधा झाल्याने 17 गायी आणि 4 म्हशींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 12:35 PM2019-05-04T12:35:56+5:302019-05-04T12:42:24+5:30

सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी येथे कोवळी ज्वारीची ताटे खाल्ल्याने 17 गायी व 4 म्हशी यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. 

17 cows and 4 buffaloes died due to poisoning in Sinnar | सिन्नरमध्ये विषबाधा झाल्याने 17 गायी आणि 4 म्हशींचा मृत्यू

सिन्नरमध्ये विषबाधा झाल्याने 17 गायी आणि 4 म्हशींचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसिन्नर तालुक्यातील कोमलवाडी येथे कोवळी ज्वारीची ताटे खाल्ल्याने 17 गायी व 4 म्हशी यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश पवार यांनी शवविच्छेदन केले.विषबाधा झाल्याने जनावरे मृत पावल्याची माहिती त्यांनी दिली.

सिन्नर (नाशिक) - सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी येथे कोवळी ज्वारीची ताटे खाल्ल्याने 17 गायी व 4 म्हशी यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. 

कोमलवाडी शिवारात काठेवाडी गवळी लोक जनावरांचा कळप घेऊन फिरत होते. या शिवारात एका शेतकऱ्याने ज्वारी कापून घेतली होती. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या ज्वारीला पुन्हा ताटे फुटली होती. या फिरस्ती गवळी लोकांनी त्यांच्या जनावरांना ज्वारीत चारा खाऊ घालण्यासाठी सोडले. कोवळया ज्वारीमुळे जनावरांना फेस येणे, चक्कर येणे सुरू झाले. त्यात 17 गायी व 4 म्हशींचा मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश पवार यांनी शवविच्छेदन केले. विषबाधा झाल्याने जनावरे मृत पावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

Web Title: 17 cows and 4 buffaloes died due to poisoning in Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.