एचएएल बनविणार १२३ ‘तेजस’ लढाऊ विमाने : सुभाष भामरे

By अझहर शेख | Published: November 18, 2018 07:00 PM2018-11-18T19:00:22+5:302018-11-18T19:00:32+5:30

एचएएलकडे काम शिल्लक नाही, अशी चुकीची माहिती पसरविली जात आहे. एचएएल बंद पडणार नाही, याची खात्री बाळगावी. कारण एचएएलच्या नाशिकसह देशातील सर्वच प्लान्टमध्ये येणाऱ्या काळात १२३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीच्या कार्याला वेग येणार आहे

123 'Tejas' fighter planes to make HAL: Subhash Bhamare | एचएएल बनविणार १२३ ‘तेजस’ लढाऊ विमाने : सुभाष भामरे

एचएएल बनविणार १२३ ‘तेजस’ लढाऊ विमाने : सुभाष भामरे

Next

नाशिक : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) २०२० पर्यंत बंद पडणार असल्याची खोटी माहिती एचएएलकडे कुठल्याही प्रकल्पाचे काम शिल्लक नसल्याच्या आधारावर पसरविली जात आहे; मात्र एचएएलमध्ये लवकरच हलक्या लढाऊ ‘तेजस’ नावाचे १२३ विमानांची निर्मिती सुरू होणार असल्याचा विश्वास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
शहरात अग्र प्रेरणा अधिवेशनाच्या उद्घाटनानिमित्त भामरे रविवारी (दि.१८) आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले. एचएएलकडे काम शिल्लक नाही, अशी चुकीची माहिती पसरविली जात आहे. एचएएल बंद पडणार नाही, याची खात्री बाळगावी. कारण एचएएलच्या नाशिकसह देशातील सर्वच प्लान्टमध्ये येणाऱ्या काळात १२३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीच्या कार्याला वेग येणार आहे. तब्बल १ लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प एचएएलला देण्यात आल्याची माहिती भामरे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, त्यामुळे २०२० नंतरही एचएएलमध्ये कामे सुरूच राहणार आहे.

एचएएलला लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर निर्मितीचे मोठ्या कामाची आॅर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे एचएएल बंद पडणार असल्याच्या अफवांवर विश्वास दाखविणे चुकीचे ठरेल, असेही भामरे यांनी यावेळी स्पष्ट केले. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर निर्मितीचे कार्य नाशिकसह देशभरातील एचएएलच्या केंद्रांमध्ये होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचबरोबर भारतीय सैन्यदलासाठी एचएएल लवकरच १००० लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मितीचे महत्त्वाचे कार्य सुरू करणार आहे. सरकारच्या संरक्षण स्वदेशीकरणामध्ये एचएएलची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. १०० विमानांची निर्मितीदेखील भविष्यात एचएएल करणार आहे, त्यामुळे एचएएलकडे काम नाही किंवा काम राहणार नाही, या सगळ्या अफवा असल्याचे भामरे यांनी रोखठोकपणे सांगितले.

Web Title: 123 'Tejas' fighter planes to make HAL: Subhash Bhamare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.