वाळवंटीकरणामुळे कोरडय़ा थंडीत होतेय वाढ

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: December 31, 2018 04:20 PM2018-12-31T16:20:30+5:302018-12-31T16:22:08+5:30

गंभीर : वृक्षतोडीमुळे खान्देशची वाळवंटीकरणाकडे वाटचाल

Dry drying due to drying | वाळवंटीकरणामुळे कोरडय़ा थंडीत होतेय वाढ

वाळवंटीकरणामुळे कोरडय़ा थंडीत होतेय वाढ

Next

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या काही वर्षापासून खान्देशातील प्रामुख्याने धुळे, जळगाव तसेच मालेगाव येथे मोठय़ा प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे बहुतेक परिसर वाळवंटीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आह़े याचा परिपाक म्हणून दिवसेंदिवस पजर्न्यमान खालावत असून उन्हाळ्यात कमाल तापमानात वाढ तर हिवाळ्यात किमान तापमानात मोठी घट होताना दिसून येत आह़े कोरडय़ा थंडीत वाढ होत असल्याने हा धोक्याचा इशारा म्हटला जात आह़े
गेल्या पंधरवाडय़ापासून धुळे व जळगाव जिल्ह्यांच्या किमान तापमानात मोठी घट होताना दिसून येत आह़े धुळे शहरात तर, गेल्या अनेक वर्षाचा विक्रम मोडीत काढत गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान 2.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविले जात आह़े जळगाव व मालेगावातदेखील 6 अंशार्पयत तापमान स्थिर आह़े उत्तरेकडून येत असलेल्या शीतलहरींसोबतच यंदा कमी झालेले पजर्न्यमान तसेच वृक्षांची होत असलेली तोड हे कोरडी थंडी वाढण्यास मोठय़ा प्रमाणात कारणीभूत ठरताना दिसत आह़े 
यंदा का गाठली किमान तापमानाने नीच्चांकी?
भूगोलाचे अभ्यासक डॉ़ ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितल्यानुसार, खान्देशाच्या उत्तरेला सातपुडा पर्वत, दक्षिणेला सह्याद्री पर्वतांच्या उपरांगा आहेत़ मध्ये तापीचे खोरे आह़े साक्री तालुक्यापासून ते थेट जामनेर्पयत डोंगररांगा आडव्या तसेच पूर्व-पश्चिम पसरलेल्या आहेत़ यात, एकूण सरासरी तापमान इतर तालुक्याच्या तुलनेत कमी आढळत़े विशेषत: धुळ्याचे भौगोलिक स्थान बघितले असता धुळ्याचा भौगोलिक आकार ढोबळमानाने एखाद्या बशीसारखा आह़े सभोवताली डोंगर-टेकडय़ा असून मधील खोलगट भागात शहराची रचना आह़े या बशीची केवळ मुक्ताईनगर व नंदुरबार अशी दोन टोके उघडी दिसून येतात़ नंदुरबार सारख्या पर्वतीय, डोंगररांगा धुळे, जळगाव तसेच मालेगावात नाही़ त्यामुळे उत्तरेकडून तसेच वायव्येकडून येणा:या शीतलहरी थोपवल्या जात नाहीत़ परिणामी धुळे व जळगाव याठिकाणी नंदुरबारच्या तुलनेत किमान तापमान घसरलेले दिसून येत आह़े  
खान्देशात धुळे व मालेगाव या दोन जिल्ह्यांची भौगोलिक रचना सारखीच दिसून येत़े तसेच नगावबारी, दक्षिणेकडे लळींग, पूर्व पश्चिम डोंगररांगा आहेत़ शिसाळ भाग असल्याने यंदा किमान तापमानात अधिकच घसरण झालेली आह़े नंदुरबारात मात्र मोठय़ा प्रमाणात डोंगराळ प्रदेश असल्याने वायव्येकडून आलेल्या शीतलहरींना सातपुडा पर्वत थोपवत असता़ त्यामुळे नंदुरबार येथील किमान तापमान धुळे व जळगावच्या तुलनेत जास्त असत़े 
कोरडी थंडी झोंबणारी
कृषी विभागाचे विभागीय कृषी  विस्तार विद्यावेत्ता डॉ़ मुरलीधर महाजन यांनी सांगितल्यानुसार जळगाव व धुळ्यात यंदा कोरडय़ा थंडीच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आह़े धुळे व जळगाव येथील हवेत आद्रता,शुष्कता कमी झालेली आह़े त्यामुळे कोरडी थंडी यंदा जास्त झोंबणारी ठरत आह़े यंदा पाऊस कमी झाल्याने शुष्कता जास्त आह़े यंदा जळगाव व धुळ्यात रेकॉर्ड ब्रेक नीच्चांकी किमान तापमान नोंदवले गेले आह़े याचे मुख्य कारण म्हणून गेल्या काही वर्षामध्ये मोठय़ा प्रमाणात होत असलेली वृक्षतोड तसेच पठारीत प्रदेश हे असू शकत़े 
हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी सांगितल्यानुसार, नंदुरबार येथील भौगोलिक कारणांमुळे नंदुरबारात धुळे व जळगावच्या            तुलनेत जास्त किमान तापमान आढळत़े नंदुरबारात डोंगराळ भाग असल्याने याठिकाणी थंड वारे थोपवले जात असतात़ दरम्यान, उत्तरकेडून येत अलेल्या शीतलहरी दरवर्षी नाशिक, निफाडचा पट्टा व्यापत असतात़ परंतु यंदा त्यांनी धुळ्याचाही काही भाग व्यापला आह़े त्यामुळे यंदा धुळ्यात रेकॉर्ड ब्रेक थंडी जाणवत असल्याचे डॉ़ साबळे यांनी सांगितल़े 
1 यंदा उत्तर भारतात मोठय़ा प्रमाणात हिमवृष्टी झालेली आह़े त्यामुळे उत्तर व वायव्येकडून मोठय़ा प्रमाणात शीतलहरी दक्षिणेकडे येत आह़े
2 हिवाळ्यात सर्वसाधारण आद्रता ही 50 ते 55 टक्के असत़े 30 टक्यांपेक्षा खाली आद्रता गेल्या त्यावेळी कोरडी थंडी निर्माण होत असत़े रविवारी धुळे व जळगावची आद्रता अनुक्रमे 21 व 26 टक्के इतकी नोंदविण्यात आली आह़े
3 दरवर्षी उत्तरेकडी शीतलहरी नाशिक, निफाड इथर्पयतचा प्रदेश व्यापत असतात़ परंतु यंदा त्यांनी जळगाव तसेच धुळे परिक्षेत्राचाही बराचसा भाग व्यापला आह़े त्यामुळे खान्देशात यंदा थंडीची लाट बघायला मिळत आह़े 
4 खान्देशात यंदा दुष्काळी स्थिती आह़े यंदाच्या पावसाळ्यात जळगावात सरासरी 663 मिमी पैकी केवळ 432 मीमी, धुळे 530 मिमी पैकी 404 मिमी तर नंदुरबारात 835 मिमी पैकी केवळ 505 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आह़े
5 दरवर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस होत असल्याने परिणामी कमाल तापमानात वाढ होऊन हिवाळ्यात किमान तापमान घटत असत़े  
    स्त्रोत : आयएमडी, पुण़े, रेनफॉल     रेकॉर्ड, कृषी विभाग,महाराष्ट्र शासऩ
 

Web Title: Dry drying due to drying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.