कष्टकरी चेह_यांवर फुलवले हास्य

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: October 24, 2018 11:32 AM2018-10-24T11:32:44+5:302018-10-24T11:32:56+5:30

आयपीएस असोसिएशनचा उपक्रम : शिरवाडे येथील महिलांची सरदार सरोवर प्रकल्पावर भ्रमंती

Blossom humor on painful faces | कष्टकरी चेह_यांवर फुलवले हास्य

कष्टकरी चेह_यांवर फुलवले हास्य

Next

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी’ या संत सावता माळी यांच्या अभंगानुसार येथील आदिवासी बांधव आपल्या कामावर निष्ठा ठेवत  पिक वाढविण्यासाठी  दिवसभर शेतात राबून, जीवाचे रान करीत असतात़ या थकलेल्या चेह:यांवर आनंद फुलवण्यासाठी ‘आयपीएस असोसिएशन’तर्फे दत्तक घेतलेल्या शिरवाडे ता़ नंदुरबार गावातील महिलांना सहलीची सफर घडवण्यात आली़ 
‘आयपीएस असोसिएशन महाराष्ट्र राज्य’ संघटनेकडून नंदुरबार तालुक्यातील साडेसातशे लोकवस्तीचे शंभर टक्के आदिवासी गाव असलेले शिरवाडे 2 ऑक्टोबर 2016 रोजी दत्तक घेण्यात आल़े ‘आयपीएस असोसिएशन’तर्फे  आतार्पयत युवक, शालेय विद्यार्थी आदींसाठी विविध कल्याणकारी कामे करण्यात आलेली आह़े महिलांसाठीही काही उपक्रम राबवता यावा यासाठी असोसिएशनतर्फे गावातील 78 महिलांना सहलीची सफर घडविण्यात आली़ 
सरदार सरोवर प्रकल्पावर नेत त्यांना प्रकल्पाची माहिती देण्यात आली़ आयुष्यात पहिल्यांदा अशा प्रकारे सहलीचा आनंद घेतल्याने ग्रामस्थ महिलांच्या चेह:यावरील हास्य पाहण्यासारखे होत़े जिल्हा पोलीस अधिक्षक संजय  पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला़ गावातील महिलांनी सरदार सरोवर प्रकल्पावर मनसोक्त भटकंती करण्याचा आनंद घेतला़ लहानपणी सहलीचा आनंद घेता आला नसल्याने ग्रामस्थ महिलांनीही यानिमित्त लहानपण अनुभवल़े
शुध्द पाण्यामुळे आजार कोसोदूर
मानवी आरोग्याची स्थिती ही संबंधित पाण्यावर अवलंबून असत़े हेच हेरत ‘आयपीएस असोसिएशनने’ शिरवाडे गावात अनेक वर्षापासून रखडलेला शुध्द पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला़ गावात ‘आरओ सिस्टीम’ बसवून आरोग्यमान सूधारल़े या शिवाय, गाव तलावाचे खोलीकरण, सोलरवर आधारीत पथदिवे, पोलीस भरतीसाठी मैदाणाची व्यवस्था आदी विविध कामे असोसिएशनकडून करण्यात आलेली आह़े जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्याकडून वेळोवेळी गावातील सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आह़े 
गाव दत्तक घेतले त्यावेळी गावात वापराचे मुबलक पाणी असले तरी, पिण्याच्या पाण्याची खुप मोठी समस्या निर्माण झालेली होती़ त्याच प्रमाणे पथदिवे, शैक्षणिक सुविधा आदींवर काम करणे गरजेचे होत़े गावात सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यावर अधिक भर देण्यात आला़ 
गावात चार बोअरवेलव्दारे वापरण्यासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येत आह़े यासाठी गावात तीन ठिकाणी पाच हजार लीटरच्या तीन प्लॅस्टीकच्या टाक्या आहेत़ तर, गावातील जुनी ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत ‘आरओ सिस्टीम’साठी राखीव ठेवण्यात आलेली आह़े चार नळांव्दारे ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी देण्यात येत असत़े ग्रामस्थांकडून शिस्तबध्दपणे ‘आरओ सिस्टीम’चे पाणी केवळ पिण्यासाठी तर बोअरवेलचे पाणी इतर कामांसाठी वापरण्यात येत आह़े गेल्या दोन वर्षापासून गावात आरओ सिस्टीमव्दारे यशस्वीरित्या पाणीपुरवठा करण्यात येत आह़े 
आरओ सिस्टीमचे पाणी ग्रामस्थांसाठी दिवसभर उपलब्ध असल्याने ग्रामस्थांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़े एकीकडे इतर गावांमध्ये पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असला तरी दुसरीकडे ‘आयपीएस असोसिएशन’च्या माध्यमातून शिरवाडे गावात शुध्द पाणी उपलब्ध झाल्याने गावापासून रोगराई कोसोदूर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े
पिण्याच्या पाण्यासोबतच गावात तब्बल 34 सौरउज्रेवर आधारीत पथदिवे बसविण्यात आले आहेत़ त्यामुळे रात्रीदेखील गाव प्रकाशमय राहण्यास मदत होत आह़े सर्व पथदिवे कार्यान्वित असून यासाठी सौरउज्रेचा वापर होत असल्याने पारंपारिक साधन संपत्तीचाही यामाध्यमातून चांगला उपयोग होत आह़े 
गावातील जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यात आलेली आह़े पहिली ते चौथीर्पयत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत एकूण 50 विद्यार्थी आहेत़ शाळेची पटसंख्या 100 टक्के असल्याने डिजीटल शाळा निर्मितीचा उद्देशही यामाध्यतून पूर्ण झालेला आह़े गावातील मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ‘आयपीएस असोसिएशन’कडून शाळेला डिजीटल करुन आकर्षक रंगरंगोटी, ई-लर्निग, पीपीटी प्रेङोंटेशन आदींच्या माध्यमातून शाळेला समृध्द केले आह़े त्यामुळे रविवारीसुध्दा विद्यार्थी शाळेत येऊन आपआपला अभ्यास करीत असतात़ आयपीएस असोसिएशनकडून शाळेला वॉलकंपाऊंड बाधण्यात येत आह़े विद्याथ्र्याचा विविध खेळांचा सराव व्हावा यासाठी भव्य क्रीडांगणाही उपलब्ध करुन देण्यात आले             आह़े
आयपीएस असोसिएशनकडून पिण्याचे पाणी, दारुबंदीची अंमलबजावणी, पथदिवे, आरोग्य व्यवस्था, प्राथमिक शिक्षण आदी विविध क्षेत्रात उल्लेखणिय काम करण्यात आले आह़े यासोबतच गावात स्वच्छतेबाबतही मोठय़ा प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात आले आह़े 

Web Title: Blossom humor on painful faces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.