नंदुरबार येथे नर्मदेत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू, 40 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 03:37 PM2019-01-15T15:37:50+5:302019-01-15T18:22:07+5:30

धडगाव तालुक्यातील भूषा येथे नर्मदा नदीत बोट उलटून 40 जण जखमी झाले.

bhauusaa-yaethae-naramadaeta-baota-ulatauuna-caalaisa-jana-jakhamai | नंदुरबार येथे नर्मदेत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू, 40 जण जखमी

नंदुरबार येथे नर्मदेत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू, 40 जण जखमी

Next

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील भूषा येथे नर्मदा नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला असून, 40 जण जखमी झाले आहेत. मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदेच्या पात्रात अंघोळीसाठी बोटीने गेलेले भाविक बोटीत बसले असताना ही दुर्दैवी घटना घडली.  भूषा येथे मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. मंगळवारीही भाविकांची गर्दी झाली होती. यादरम्यान एका बोटीत 50 भाविक बसून नदीत फेरफटका मारत असताना वजनाने बोट उलटून 40 जण जखमी झाले. ही माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू झाल्यानंतर भाविकांना वाचवण्यात आले. 40 जण गंभीरपणे जखमी झाल्याने त्यांना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येत होत़. दुपारी गंभीर रुग्णांना नंदुरबार आणि धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत होते. 


Web Title: bhauusaa-yaethae-naramadaeta-baota-ulatauuna-caalaisa-jana-jakhamai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.