नांदेडात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुकाने फोडली

By अविनाश पाईकराव | Published: January 18, 2024 03:29 PM2024-01-18T15:29:27+5:302024-01-18T15:29:36+5:30

शहरातील भाग्यनगर कमानी जवळ असलेल्या दोन दुकानांत चोरी

Scam of thieves in Nanded; Two shops were broken into in the same night | नांदेडात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुकाने फोडली

नांदेडात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुकाने फोडली

नांदेड- शहरातील भाग्यनगर भागात चोरट्यांनी एकाच रात्री मेडिकल दुकानासह ट्रॅव्हल एजंसीच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील साठ हजाराची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज घरफोडीच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री ही शहरातील भाग्यनगर कमानी जवळ असलेले निखिल टोकले यांचे मेडिकल दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील ४५ हजाराची रक्कम चोरट्यांनी चोरली. त्यानंतर त्यांच्या शेजारील योगेश शेंबोले यांच्याही ट्रॅव्हल एजंशी दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील १५ हजाराची रोकड पळवली.

ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर फॉरेन्सिक इनवेस्टीगेशन व्हेनला पाचारण करण्यात आले होते. यावेळी फॉरेन्सिक लॅब कर्मचाऱ्यांनी पंचनामा करत घटना स्थळावरील ठस्यांचे नमुने घेतले. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Scam of thieves in Nanded; Two shops were broken into in the same night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.