‘अवनी’ला गोळी मारणे बेकायदाच; व्याघ्र प्राधिकरण समितीचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:21 AM2018-12-07T05:21:44+5:302018-12-07T05:22:00+5:30

टी-१ (अवनी) वाघिणीला बेशुद्ध करून तिला जेरबंद करणे आवश्यक असताना तिला गोळी घालून ठार करणे बेकायदा होते, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने राज्याचा वन विभाग आणि शिकारी असगर अली खान याच्यावर ठेवला आहे.

Shooting to 'Avani' is illegal; The Tiger Reserve Committee's objection | ‘अवनी’ला गोळी मारणे बेकायदाच; व्याघ्र प्राधिकरण समितीचा आक्षेप

‘अवनी’ला गोळी मारणे बेकायदाच; व्याघ्र प्राधिकरण समितीचा आक्षेप

googlenewsNext

नागपूर/मुंबई : टी-१ (अवनी) वाघिणीला बेशुद्ध करून तिला जेरबंद करणे आवश्यक असताना तिला गोळी घालून ठार करणे बेकायदा होते, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने राज्याचा वन विभाग आणि शिकारी असगर अली खान याच्यावर ठेवला आहे.
यवतमाळातल्या राळेगाव जंगलातील नरभक्षक टी-१ वाघिणीला २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शूटर असगर अली खान याने
गोळ्या घालून ठार केले होते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी वन्यप्राणीप्रेमींनी केली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दोन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच सादर
केला आहे.
अवनीच्या संदर्भात वन विभागाने चांगली पूर्वतयारी केली होती; मात्र २ नोव्हेंबर रोजी तिला आणि तिच्या शावकांना पकडण्यासाठी योग्य नियोजन केले गेले नाही. शिवाय, स्वसंरक्षणार्थ अवनीला गोळी घालावी लागली, असा दावा शार्पशूटर असगर अली खान याने केला होता.
मात्र, अवनी पाठमोरी असताना तिला गोळी घालण्यात आल्याचे शवविच्छेदनातून दिसून येते, असे समितीने म्हटले आहे.
अवनीला गोळ्या घालणारा शिकारी असगर अली खान याने भारतीय शस्त्रास्त्र कायदा १९५८ च्या ३(१), इंडियन व्हेटरनरी कौन्सिल अ‍ॅक्ट १९८४, वन्यजीव रक्षक कायदा १९७२ आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या स्टॅण्डर्ड आॅपरेटिव्ह प्रोसिजर(एसओपी)चा भंग झाल्याचे एनटीसीच्या अहवालात म्हटले
आहे. शिवाय, अवनीला बेशुद्ध करताना वापरलेल्या डार्टमधील औषध ५६ तास जुने असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला न्यायालयात नेण्याची तयारी वन्यप्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे.
>पशुवैद्यकीय परिषदही करणार कारवाई
आता या अहवालात वन विभागाने वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी जे डार्ट मारले ते कुठल्याही पशुवैद्यकीय तज्ज्ञ नसताना मारले. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदही या प्रकरणात कारवाई करणार असल्याचे सांगितले जाते.
>अहवाल नाही
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने नेमलेल्या समितीने हा अहवाल राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन अणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांना सादर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असा कुठलाही अहवाल राज्य सरकारला अद्याप प्राप्त झालेला नाही, असे वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
>नरभक्षक टी-१ वाघिणीला २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शूटर असगर अली खान याने गोळ्या घालून ठार केले होते.

 

Web Title: Shooting to 'Avani' is illegal; The Tiger Reserve Committee's objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.