आजवर २१ हजार कोटींची कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी, विदर्भ व मराठवाड्याला अधिक लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:16 AM2017-12-15T00:16:45+5:302017-12-15T00:17:13+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकूण ६९ लाख खातेधारकांपैकी आजवर ४३ लाख १६ हजार ७६८ खातेधारकांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

Debt forgiveness of Rs 21,000 crore; The Chief Minister said the above figures, the more benefits of Vidarbha and Marathwada | आजवर २१ हजार कोटींची कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी, विदर्भ व मराठवाड्याला अधिक लाभ

आजवर २१ हजार कोटींची कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी, विदर्भ व मराठवाड्याला अधिक लाभ

googlenewsNext

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकूण ६९ लाख खातेधारकांपैकी आजवर ४३ लाख १६ हजार ७६८ खातेधारकांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यापैकी २२ लाख ४६ हजार शेतक-यांच्या खात्यात २० हजार ७३४ कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केली.
नियम २९३ अन्वये सत्ताधारी आमदारांनी उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी कर्जमाफीची नेमकी आकडेवारी वारंवार बदलण्यात आल्याचा आरोप करीत नेमकी किती शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची किती रक्कम जमा झाली याची माहिती सादर करण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांना दिले होते. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,आॅनलाईन प्रक्रियेच्या पूर्वी एका राष्ट्रीयीकृत बँकेने साडेसहा लाख लाभार्थ्यांची यादी सादर केली होती.
आॅनलाईन माहिती मागविली असता असे लक्षात आले की, फक्त सव्वा लाखच पात्र खातेधारक आहेत. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या (एसएलबीसी) पहिल्या यादीत कृषी कर्ज खातेधारकांची संख्या ८९ लाख व थकबाकीची रक्कम ३४ हजार कोटी सांगण्यात आली. आॅनलाईन तपासणीत खातेधारक ६९ लाखच आढळले.
आधार कार्ड लिंक केल्यामुळे ही माहिती समोर आली. फक्त ४५ दिवसांत एक कोटीहून अधिक शेतकºयांची आॅनलाईन बायोमेट्रिक खातरजमा करण्यात आली. यामुळे अपात्र खात्यांमध्ये जाणारे कोट्यवधी रुपये वाचविण्यात सरकारला यश आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने २००६ मध्ये केलेल्या कर्जमाफीत एका आमदाराच्या घरातील आठ सदस्यांना लाखोंची कर्जमाफी मिळाली तर दुसरीकडे विदर्भातील अल्पभूधारकाच्या अटीमुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकºयांना फायदा मिळाला नाही. त्यावेळी विदर्भाला फक्त १५०० कोटी व मराठवाड्याला १७०० कोटी मिळाले होते. आमच्या कर्जमाफीत विदर्भातील ११ लाख खातेधारकांना ५,७५४ कोटी, मराठवाड्यातील सहा लाख शेतकºयांना सहा हजार कोटी व उत्तर महाराष्ट्रातील सात लाख खातेधारकांना ३,७०४ कोटी रुपये मिळाले आहेत. काही जिल्ह्यांना तर एक हजार कोटीहून अधिक रुपये मिळाले असल्याचे सांगत या कर्जमाफीने संकटग्रस्त शेतकºयांना न्याय दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. या पुढील कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे़

Web Title: Debt forgiveness of Rs 21,000 crore; The Chief Minister said the above figures, the more benefits of Vidarbha and Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.