मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर

By कमलेश वानखेडे | Published: July 7, 2023 02:18 PM2023-07-07T14:18:33+5:302023-07-07T14:19:23+5:30

कोटगुल रोड येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात होणार सहभागी

Chief Minister Eknath Shinde on a visit to Gadchiroli on july 8 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर

googlenewsNext

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. एमआयडीसी मैदान, कोटगुल रोड येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांचे शनिवारी सकाळी १०.१५ वाजता शासकीय विमानाने मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीसाठी रवाना होतील. सकाळी ११ वाजता एमआयडीसी मैदान, कोटगुल रोड येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात सहभागी होत विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ देतील तसेच यंत्रणेला आवश्यक सूचना देतील. दुपारी १.०५ वाजता ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीहून नागपूरसाठी रवाना होतील व दुपारी १.४५ वाजता शासकीय विमानाने नागपूर विमातळावरून मुंबईसाठी रवाना होतील.

Web Title: Chief Minister Eknath Shinde on a visit to Gadchiroli on july 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.