अ‍ॅड. उज्ज्वल निकम घेणार राजकारण्यांची उलटतपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:56 AM2018-07-12T05:56:35+5:302018-07-12T05:56:49+5:30

‘लोकमत की अदालत’मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची उलटतपासणी घेणार आहेत.

 Adv. Interrogation of politicians will take lighten note | अ‍ॅड. उज्ज्वल निकम घेणार राजकारण्यांची उलटतपासणी

अ‍ॅड. उज्ज्वल निकम घेणार राजकारण्यांची उलटतपासणी

Next

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गुरुवारी सन्मानित करण्यात येणार आहे. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आमदारांचा सन्मान केला जाणार आहे.
वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता हा समारंभ सुरू होईल. सरपंच पदापासून संसदेपर्यंत उत्तम कामगिरी करणा-या लोकप्रतिनिधींचा गौरव करण्याची प्रथा ‘लोकमत’ने सुरू केली आहे. या मालिकेतील विधिमंडळ पुरस्काराचे हे दुसरे पुष्प आहे. या वर्षी हे पुरस्कार कुणाला मिळणार याकडे अवघ्या महाराष्टÑाचे लक्ष लागून आहे. याच कार्यक्रमात ‘लोकमत की अदालत’मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची उलटतपासणी घेणार आहेत.
यंदाच्या ज्युरी मंडळात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे आणि ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर या मान्यवरांचा समावेश होता.
याच सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
विधिमंडळात चांगली कामगिरी करणाºया आमदारांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव करणारे ‘लोकमत’ हे एकमेव वर्तमानपत्र आहे. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे. परंतु, अलीकडच्या काळात संसद असो की देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, विचारमंथन न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. त्यामुळे संसदीय लोकशाही व्यवस्थेविषयी तरुण पिढीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने ‘लोकमत’ या पुरस्काराचे आयोजन करत आहे.
 

Web Title:  Adv. Interrogation of politicians will take lighten note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.