World  Beard Day : मुलं का ठेवतात दाढी, जाणून घ्या उत्तरं 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 11:20 AM2018-09-01T11:20:05+5:302018-09-01T11:25:09+5:30

दाढी, भिकबाळी आणि फेटा हा सर्वात भारी पारंपरिक लूक असल्याचं माझं ठाम मत आहे.हा लूक केल्यावर मला मुलींकडून खूप कॉम्प्लिमेंट्स आल्या आहेत. 

World Beard Day: Why boys keep the beard, know answers | World  Beard Day : मुलं का ठेवतात दाढी, जाणून घ्या उत्तरं 

World  Beard Day : मुलं का ठेवतात दाढी, जाणून घ्या उत्तरं 

googlenewsNext

पुणे :सध्या क्लीन शेव्ह करण्यापेक्षा दाढी ठेवण्यावर अधिक भर दिसून येतो.विराट कोहली, रणबीर सिंग, अमिताभ बच्चन यांना आजही दाढी ठेवून फॉलो करण्याचा ट्रेंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी दाढी ठेवण्याचा मोहही अनेकांना आवरत नाही.याशिवायही अशी कारणे आहेत ज्यामुळे आजचे तरुण दाढी राखण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याशी याच विषयावर चर्चा केली असता, काही मजेशीर उत्तर मिळाली आहेत. 

पूर्वी कॉपोरेट ऑफिसमध्ये दाढी करण्याचा नियम होता. तुकतुकीत दाढी न करणाऱ्या व्यक्तीवर सहजपणे गबाळा आहे असा शेरा मारला जायचा. आता मात्र हा समज दूर झाला आहे.अगदी काही ठराविक क्षेत्र सोडली तर दाढी करणे - न करणे यावर काहीही  अवलंबून नसल्याचे मत तरुणांना वाटते.

एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणारा वरूण सांगतो की, मी इंटरव्हूसोडून कधीही क्लीन शेव्ह करून ऑफिसला गेलो नाही.अगदी महत्वाच्या मीटिंगलाही माझी ट्रीम शेव्हचं असते.माझं मत आहे की, 'थोडीशी दाढी असेल तर लोक तुम्हाला अधिक सिरियसली घेतात'. माझ्या अनेक मैत्रिणी दाढी केल्यावर वाईट दिसतो असं आवर्जून सांगतात त्यामुळेही मी शक्यतो क्लीन शेव्ह करत नाही. 

जयदीप सांगतो, मी अशी काही ठरवून दाढी वाढवली नव्हती.पण आता ही स्टाईल इतकी सूट झाली आहे की, मी दाढी काढण्याचा विचारही करत नाही.मी दाढीच्या अनेक स्टाईल ट्राय केल्या असून त्यामुळे अगदी अनोळखी लोकही थांबून कॉम्प्लिमेंट देतात असा माझा अनुभव आहे.दाढी असलेली आणि दाढी नसलेली व्यक्ती एकशेजारी उभी केली तर दाढी असलेल्या व्यक्तीकडे अधिक लक्ष जाते असं मला वाटत. 

आशिष सांगतो, मी वर्षभर दाढी ठेवत नाही.माझं गणपतीच्या काळात मी ढोल वाजवतो.त्यामुळे अशावेळी दाढी असेल तर लूक जास्त चांगला वाटतो. या काळात मी महिनाभर आधीपासूनच दाढी राखतो.दाढी, भिकबाळी आणि फेटा हा सर्वात भारी पारंपरिक लूक असल्याचं माझं ठाम मत आहे.हा लूक केल्यावर मला मुलींकडून खूप कॉम्प्लिमेंट्स आल्या आहेत. 

लखन सांगतो, माझी दाढीची स्टाईल मला सर्वाधिक प्रिय आहे.दाढी वेळोवेळी ट्रीम करण्याकडे तर माझे लक्ष असतेच पण मी काही वर्षांपूर्वी दाढीची एक बट कलर केली होती.माझ्या त्या स्टाईलला भरपूर कमेंट्स मिळाल्या. माझ्या या स्टाइलमुळे मी अनेकांमध्येही उठून दिसतो आणि लक्षातही राहतो. 

तेजस म्हणाल्या, मला छत्रपती शिवरायांप्रमाणे दाढी ठेवायला आवडते. अर्थात त्यासाठी व्यवस्थित मेन्टेन करावी लागते.पण एकदा हौस असेल तर थोडे कष्ट तर घ्यावेच लागतात. मला वाटत दाढी ही शान आहे आणि ती स्टाईलमध्ये मिरवता आली पाहिजे.अशा दाढीकडे सगळेच बघतात अर्थात त्यात मुलीही आहेतच. 

प्रणव सांगतो, मी असा काही खास विचार करून दाढी वाढवली नव्हती. माझी शरीरयष्टी फार नसल्यामुळे उंची आणि फीचर्स असूनही पर्सनॅलिटी खुलत नव्हती. माझा हा प्रश्न दाढीने सोडवला.दाढीमुळे माझी पर्सनॅलिटी भारी दिसतेच पण आत्मविश्वासही अधिक जाणवतो. आता ती माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग झाली आहे. 

Web Title: World Beard Day: Why boys keep the beard, know answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.