पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो - श्रीहरी अणे

By Admin | Updated: March 26, 2016 13:10 IST2016-03-26T12:41:30+5:302016-03-26T13:10:12+5:30

पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो असा आरोप करत आपण अजूनही वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचं श्रीहरी अणे बोलले आहेत

Western Maharashtra steals the money of Vidarbha - Shriheri Ane | पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो - श्रीहरी अणे

पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो - श्रीहरी अणे

>ऑनलाइन लोकमत - 
नागपूर, दि. २६ - पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो असा आरोप करत आपण अजूनही वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचं श्रीहरी अणे बोलले आहेत. वेगळ्या मराठवाड्याच्या मुद्यावरुन झालेल्या गदारोळानंतर महाधिवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच अणे नागपुरात आले होते यावेळी ते बोलत होते. नागपुरात संविधान चौकात श्रीहरी अणेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. 
 
विदर्भासाठीचा पैसा तसाच तिजोरीत राहतो. पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो. आम्ही काय खाणार यापेक्षा तुम्ही तुमची काळजी करा असा टोलाही श्रीहरी अणेंनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना लगावला आहे. विदर्भ वेगळा झाल्यास पश्चिम महाराष्ट्र काय खाईल ? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. 60 वर्षात महाराष्ट्राने विदर्भाला धरणे दिली नाहीत. विदर्भाला साधं पाणीही मिळालं नाही. 
 

Web Title: Western Maharashtra steals the money of Vidarbha - Shriheri Ane