ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी
By Admin | Updated: October 18, 2015 18:14 IST2015-10-18T18:14:33+5:302015-10-18T18:14:33+5:30
वस्त्रहरण, दोघी, वनरुम किचन या गाजलेल्या नाटकांचे लेखन करणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची ९६ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - वस्त्रहरण, दोघी, वनरुम किचन या गाजलेल्या नाटकांचे लेखन करणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची ९६ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासंदर्भात नाट्य परिषदेची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने गंगाराम गवाणकर यांच्यानावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गवाणकर यांचे वस्त्रहरण हे नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजले. मालवणी भाषेला उंची गाठून देण्यात गवाणकर यांनी मोलाचे योगदान दिले. नाट्यसंमेलनाचे स्थळ अद्याप निश्चित झाले नसून सातारा व ठाणे या दोन शहरांची नावे आघाडीवर आहेत. बेळगाव येथे पार पडलेल्या ९५ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज शेख यांनी भूषवले होते.