उद्धव ठाकरेंचं आज वस्त्रहरण करणार - नारायण राणे

By admin | Published: July 18, 2014 02:18 PM2014-07-18T14:18:44+5:302014-07-18T14:18:44+5:30

उद्धव ठाकरे यांचं आज संध्याकाळी मी वस्त्रहरण करणार आहे असं सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेशी दोन हात करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Uddhav Thackeray will do an apparel today - Narayan Rane | उद्धव ठाकरेंचं आज वस्त्रहरण करणार - नारायण राणे

उद्धव ठाकरेंचं आज वस्त्रहरण करणार - नारायण राणे

Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १८ - उद्धव ठाकरे यांचं आज संध्याकाळी मी वस्त्रहरण करणार आहे असं सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेशी दोन हात करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राणेंनी काँग्रेसच्या मंत्रीपदाचा राजीनामा सोमवारी देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. काँग्रेसमध्ये नऊ वर्षांपूर्वी प्रवेश करताना देण्यात आलेली आश्वासने पाळली गेली नसल्याने तसेच राणेसमर्थकांना वेळोवेळी डावलण्यात आल्याने राणे मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे दिसत आहे. गेले काही महिने राणे भाजपा नेत्यांच्या संपर्कात होते आणि ते भाजपात प्रवेश करतील अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शिवसेनाप्रमुखांना त्रास दिलेल्या माणसाला शिवसेनेत प्रवेश तर मिळणारच नाही, शिवाय त्याला भाजपानेही घेऊ नये आणि युतीच्या धर्माचे पालन करावे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे नारायण राणेंना भाजपा प्रवेशाचे मार्ग तूर्तास तरी बंद झाल्याचे दिसत आहे. परिणामी काँग्रेसचे मंत्रीपद सोडणार परंतु काँग्रेसमध्येच राहणार अशी विचित्र भूमिका घेण्याचे त्यांच्या वाट्याला आले आहे.
उद्धव ठाकरेंनी संधी मिळेल तेव्हा माझा अपमान केला असून आपण गप्प राहिलो, आता मात्र गप्प बसणार नाही असे सांगत राणे यांनी शुक्रवारी संध्याकाळी कणकवलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांचे वस्त्रहरण करण्याचा नारा दिला असून राणे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Uddhav Thackeray will do an apparel today - Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.