तुकाराम मुंढेंची 'देवबंदी'; नाशिक पालिकेतील देवी-देवतांचे फोटो हटवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 12:23 PM2018-02-13T12:23:50+5:302018-02-13T12:53:48+5:30

पालिकेच्या भिंतींवर आता महापुरुषांचेच फोटो राहणार आहेत.

Tukaram Mundhni Deobandi; Photos of Goddesses of Nashik Municipal Corporation were deleted | तुकाराम मुंढेंची 'देवबंदी'; नाशिक पालिकेतील देवी-देवतांचे फोटो हटवले

तुकाराम मुंढेंची 'देवबंदी'; नाशिक पालिकेतील देवी-देवतांचे फोटो हटवले

googlenewsNext

नाशिक: आपल्या बेधडक कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासूनच संबंधितांना धक्के द्यायला सुरुवात केली आहे. नुकताच त्यांनी एका सरकारी निर्णयाचा आधार घेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देवी-देवतांचे फोटो लावून कामकाज करण्यावर बंदी घातली आहे. मुंढे यांच्या अल्टिमेटमनुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटीचे दोन दिवस कार्यालयात येऊन महापालिका कार्यालयाची स्वच्छता केली. पालिकेच्या भिंतींवर आता महापुरुषांचेच फोटो राहणार आहेत.

या आदेशानंतर आयुक्तांच्या स्वीय सचिवांच्या कक्षात असलेली दत्ताची तसबिर काढण्यात आली तर अन्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील तसबिरी हटविल्या. मुंढे यांनी देवबंदी करत न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले असले तरी श्रद्धेला हात घालून ‘पारदर्शक’ कारभार होईल काय, असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. मुंढे यांनी अधिका-यांनी कार्यालयात येताना जीन्स पँट, टी-शर्ट घालून येऊ नये, फॉर्मल ड्रेसमध्येच यावे, पायात स्पोर्ट शूज नकोत, असे आदेशही दिल्याचे समजते. त्यामुळे, अधिकारी वर्ग धास्तावला असून ड्रेस-शूज आणि प्रशासकीय कामकाजाची घालण्यात आलेली सांगड चर्चेचा विषय बनली आहे. राजीव गांधी भवनमधील प्रवेशद्वारावर लागणा-या दुचाकीही हटविण्याचे निर्देश मुंढे यांनी दिल्याचे समजते. याशिवाय, त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना परस्पर प्रसारमाध्यमांशी बोलण्यावरही बंदी घातली आहे. यावरून मुंढे यांनी प्रसिद्धीचा झोत केवळ आपल्यावरच राहण्याची केलेली ही योजकता मुंढे यांच्या अंगलट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Tukaram Mundhni Deobandi; Photos of Goddesses of Nashik Municipal Corporation were deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.