कार अपघातात जळगावचे तीन ठार

By Admin | Updated: April 4, 2015 02:03 IST2015-04-04T02:03:09+5:302015-04-04T02:03:09+5:30

मलकापूरनजिक वाघूड फाट्यावरील अपघात.

Three dead in a car accident in Jalgaon | कार अपघातात जळगावचे तीन ठार

कार अपघातात जळगावचे तीन ठार

मलकापूर (जि. बुलडाणा) : अकोल्याकडे जाणारी भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने बंद दुकानावर आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मलकापूरनजिक वाघुड फाट्यावर शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. अपघातातील सर्वजण जळगाव जिलतील जामनेरचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये दत्तात्रय धनराज धोंडगे (६0) आणि श्रीकृष्ण धनराज धोंडगे (५८) व भागवत शेनफडू गिते (६५) यांचा समावेश आहे. तर बाबूराव धनराज धोंडगे (५९) आणि सुदाम भिका चौधरी (५0) अशी गंभीर जखमींची नावे असून, त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले. जळगाव जिलतील जामनेर येथील धोंडगे परिवार शुक्रवारी नातेवाईकांसह कारने अकोला येथे साक्षगंधासाठी निघाले होते. कारमध्ये चालकासह पाच जण होते. सकाळी ८ च्या सुमारास वाघुड शिवारात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या डाव्या बाजुला उतरली. त्यात समोरील उजवे टायर फुटले. त्यामुळे भरधाव कार बंद असलेल्या एसटीडी दुकानावर आदळल्याने दुकानाची भिंत पडली. यात कारच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. तिघेजण जागीच ठार तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले.

Web Title: Three dead in a car accident in Jalgaon