महिला कॉन्स्टेबलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे एसीपींसह कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 04:15 IST2017-09-08T04:14:57+5:302017-09-08T04:15:10+5:30
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवारला (२१, रा. कळवा, मनीषानगर) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त

महिला कॉन्स्टेबलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे एसीपींसह कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
ठाणे : ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवारला (२१, रा. कळवा, मनीषानगर) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे आणि तिचा भावी पती मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने दोघांनाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुभद्राचे अमोलसमवेत लग्न ठरले होते. बुधवारी हे दोघे जेवणासाठी तिच्या घरी एकत्र बसले असताना एसीपी निपुंगे यांचे तिच्या मोबाइलवर वारंवार फोन येत होते. वारंवार येणाºया फोनची चौकशी केल्यानंतर सारिकाने एसीपी निपुंगे यांच्याकडून होणाºया त्रासाची अमोलला माहिती दिली.
‘तुझ्या ड्युटीची सेटिंग करून देतो, तू मला भेटायला ये,’ असे ते सांगत असल्याचेही तिने त्याला सांगितले. यातूनच त्यांच्यातही काहीतरी बिनसले. काहीतरी वादही झाला.