धक्कादायक; कर्ज न घेता दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 10:10 AM2019-06-26T10:10:48+5:302019-06-26T10:11:07+5:30

राज्यात असलेल्या दिव्यांग शेतकऱ्यांनी कर्ज मिळावे म्हणून दिव्यांग महामंडळाकडे अर्ज केले होते

Shocking Without taking any loan, the farmers of Divyan farmers will not be able to pay the same | धक्कादायक; कर्ज न घेता दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा

धक्कादायक; कर्ज न घेता दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा

Next

मुंबई - राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कोणतेही कर्ज न घेता बोजा टाकण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. राज्यातील १०९ असे शेतकरी आहेत ज्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या असल्याचे आरोप गजभिये यांनी केला आहे. मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यात असलेल्या दिव्यांग शेतकऱ्यांनी कर्ज मिळावे म्हणून दिव्यांग महामंडळाकडे अर्ज केले होते. मात्र त्यांनी फक्त अर्ज केला म्हणून त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाची नोंद करण्यात आल्या असून, बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे भरण्यासाठी तगादा लावला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणतेही कर्ज मिळाले नसल्याचा गंभीर आरोप आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. राज्यात अशी १०९ असे शेतकरी असून त्यांना कर्ज घेण्यासाठी अडचणी येत असल्याचे गजभिये म्हणाले.

शिवसेना-भाजप सरकारच्या काळात अपंग शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. सत्तेत असलेल्या पक्षांच्या जाहीरनाम्यात सातबारे कोरे करण्याचा आश्वासन होते, मात्र राज्यात एकही ऑनलाइन  सातबारा कोरा झाला नाहीत. सातारा,गोंदिया,भंडारा,अमरावती या भागात ऑनलाइन  सातबाऱ्याच्या प्रकरणात मूळ कुळाच्याच नोंदी काढण्यात आल्या आहे. त्या कायद्यालाच समाप्त करण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोप गजभिये यांनी केला आहे.

 

 

 

Web Title: Shocking Without taking any loan, the farmers of Divyan farmers will not be able to pay the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.