एसटीच्या चालक तथा वाहक पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर, उत्तीर्णांमध्ये ७४२ महिलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 09:22 PM2019-03-09T21:22:55+5:302019-03-09T21:23:38+5:30

एसटीतर्फे चालक तथा वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेला बसलेल्या ३५ हजार ४६३ उमेदवारांपैकी ३० हजार ६८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

The results of written test for ST driver | एसटीच्या चालक तथा वाहक पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर, उत्तीर्णांमध्ये ७४२ महिलांचा समावेश

एसटीच्या चालक तथा वाहक पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर, उत्तीर्णांमध्ये ७४२ महिलांचा समावेश

Next

मुंबई  - एसटी तर्फे चालक तथा वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेला बसलेल्या ३५ हजार ४६३ उमेदवारांपैकी ३० हजार ६८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये तब्बल ७४२ महिलांचा समावेश आहे. सदर निकाल महामंडळाच्या www.  msrtc. gov.  in या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहे. 
 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र  व शारिरीक उंची  व अन्य अहर्तासंबंधीची तपासणी झाल्यानंतर १०० गुणांची संगणकीकृत वाहन चालन चाचणी होणार आहे .या चाचणीचे गुण व लेखी परीक्षेचे गुण एकत्रित करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल . तसेच ज्या महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत , त्यांची केवळ शारीरिक उंची व अन्य   अहर्तासंबंधीच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन त्यांना एसटीतर्फे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे.

Web Title: The results of written test for ST driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.