पोलीस भरती घोटाळा: पुणे, नांदेडमध्ये पुन्हा परीक्षा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 12:11 PM2018-05-02T12:11:41+5:302018-05-02T12:11:41+5:30

भरतीत घोटाळा झाल्यानं परीक्षा रद्द

reexamination will take place for nanded police recruitment test | पोलीस भरती घोटाळा: पुणे, नांदेडमध्ये पुन्हा परीक्षा होणार

पोलीस भरती घोटाळा: पुणे, नांदेडमध्ये पुन्हा परीक्षा होणार

googlenewsNext

नांदेड: पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचं पुढे आल्यानंतर आता नांदेड आणि पुण्यात पुन्हा लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. नांदेडमध्ये झालेल्या पोलीस भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचं पुढे आलं होतं. यानंतर पोलीस अधिक्षकांनी परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. नांदेडपाठोपाठ पुण्यातील पोलीस भरती परीक्षासुद्धा रद्द करण्यात आलीय. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणचं कंत्राट एसएसजी कंपनीला मिळालं होतं. 

नांदेडमधील फेर लेखी परीक्षेची तारीख आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणाराय. याचा फायदा शेकडो विद्यार्थ्यांना होणाराय. 72 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 1198 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती. याठिकाणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून रोख रक्कम घेऊन काही विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना पुढे पोलीस भरती परीक्षा देता येणार नाही. 

पोलीस भरती परीक्षा घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदारानं एसआरपीएफच्या उमेदवारांकडून 2.50 कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली. त्यानंतर आता परीक्षा रद्द करण्याची वेळ आलीय. प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम देण्यात आलं होतं. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केला.
 

Web Title: reexamination will take place for nanded police recruitment test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.