झायरा वसीमची छेडछाड करणा-याला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 10:32 PM2017-12-10T22:32:36+5:302017-12-10T23:03:39+5:30

मुंबई- धाकड गर्ल आणि काश्मिरी अभिनेत्री झायरा वसीमशी विमानामध्ये असभ्य वर्तन करणा-याला सहार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विकास सचदेव असं या व्यक्तीचं नाव असून, पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत.

In the possession of the police who behave vulgarly with Jaira Vaasim | झायरा वसीमची छेडछाड करणा-याला पोलिसांनी केली अटक

झायरा वसीमची छेडछाड करणा-याला पोलिसांनी केली अटक

Next

मुंबई- धाकड गर्ल आणि काश्मिरी अभिनेत्री झायरा वसीमशी विमानामध्ये असभ्य वर्तन करणा-याला सहार पोलिसांनी अटक केली आहे. विकास सचदेव असं या व्यक्तीचं नाव असून, पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत. झायरा वसीमनं आपल्या इन्स्टाग्रामवर विमानातील छेडछाडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. झायरा काल नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तारा एअरलाइन्सने प्रवास करत असताना तिच्यासोबत हा प्रसंग घडला होता.

झायरा वसीम शनिवारी दिल्लीहून आईसह मुंबईला विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून येत होती. तिने बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. ‘1 एफ’ सीटवर ती व बाजूला तिची आई तर मागील ‘2 एफ’ वर 45 वर्षांचा एक इसम बसलेला होता. नऊ वाजून 20 मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतले. थोड्याच वेळात संबंधित प्रवाशाने पायाच्या बोटाने झायराची मान व पाठीला स्पर्श केला. त्याबाबत सांगूनही दुर्लक्ष करत राहिल्याने अखेर ती घाबरून किंचाळली.

मात्र कोणीही कर्मचारी किंवा प्रवासी तेथे आला नाही. झायराने या प्रकाराचे मोबाईलवर शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानातील अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. सुमारे दहा मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. ‘विस्तारा एअरलाइन्स’च्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करीत असताना घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती 17 वर्षीय झायराने स्वत: विमानातून उतरल्यानंतर मध्यरात्री ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केली. ती घटना सांगताना तिला अश्रू रोखता आले नाहीत. त्यानंतर जगभरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत संबंधित प्रवाशाविरुद्ध विनयभंग व बालक अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉस्को) गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेऊन अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्यासह राजकीय, सामाजिक व बॉलिवूडमधील विविध मान्यवरांनी याबाबत सोशल मीडियावरुन निषेध नोंदवत संबंधित विकृत प्रवाशावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: In the possession of the police who behave vulgarly with Jaira Vaasim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.