पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील कोल्हापूरचे स्पेशल IG

By Admin | Updated: June 24, 2016 20:04 IST2016-06-24T19:00:19+5:302016-06-24T20:04:05+5:30

मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या गृहखात्याने शुक्रवारी 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत.

Police officers transfer, trust Nangare Patil Kolhapur Special IG | पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील कोल्हापूरचे स्पेशल IG

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील कोल्हापूरचे स्पेशल IG

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या गृहखात्याने शुक्रवारी 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. महत्त्वाच्या बदल्यांमध्ये पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे तर औरंगाबादमध्ये त्यांच्या जागी अजित पाटील यांची बढती देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पाटील हे पुण्याला आर्थिक शाखेमध्ये उपमहानिरीक्षक होते.
 
अन्य बदल्या पुढीलप्रमाणे:
कैसर खलिद यांना महानिरीक्षकपदी बढती, जी. एम. पाटील यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी अहमदनगरला बढती, अमोघ गावकर यांची पोलीस अधीक्षक म्हणून सिंधुदुर्गमध्ये बढती, IPS सुनील फुलारी यांची कमांडंट SRPF, पुणे येथे बढती, IPS निर्मला देवी यांची पोलीस अधीक्षक नागपूरमध्ये बदली, IPS महेश घुर्ये यांची कमांडर SRPF मुंबई येथे बढती, भारत तांगडे यांची कमांडंट SRPF, जालना अशी बदली आणि पंजाबराव उगले यांची नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

 

Web Title: Police officers transfer, trust Nangare Patil Kolhapur Special IG