वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे 'पद्मश्री' जिव्या म्हशे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 09:19 AM2018-05-15T09:19:17+5:302018-05-15T11:37:31+5:30

पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांचे आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झाले.

Padmashree Jeevya Mhase passes away | वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे 'पद्मश्री' जिव्या म्हशे यांचं निधन

वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे 'पद्मश्री' जिव्या म्हशे यांचं निधन

googlenewsNext

पालघर: डहाणू/बोर्डी -

वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे 'पद्मश्री' जिव्या म्हशे यांचं आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झाले. डहाणू तालुक्यातील गंजाड गावच्या कलमीपाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी पवनी, विठ्ठल, सदाशिव आणि बाळू ही तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहोचवण्यात मशे यांचा मोलाचा वाटा होता.  

(Maharashtra Day: वारली संस्कृती सातासमुद्रापार नेणारे जिव्या)

 

Web Title: Padmashree Jeevya Mhase passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.