चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चार पटीने वाढली - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 12:36 PM2018-04-10T12:36:29+5:302018-04-10T12:36:29+5:30

 चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चारपटीने वाढली आहे. 2014 साली राज्यात 5700 कि.मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते 2017-18 मध्ये वाढून 22,436 कि.मी एवढे झाले. असे  राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

The National Highway has increased four times in four years - Sudhir Mungantiwar | चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चार पटीने वाढली - सुधीर मुनगंटीवार

चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चार पटीने वाढली - सुधीर मुनगंटीवार

Next

 मुंबई - चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चारपटीने वाढली आहे. 2014 साली राज्यात 5700 कि.मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते 2017-18 मध्ये वाढून 22,436 कि.मी एवढे झाले. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या टीमचे हे यश आहे, असे  राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ॲण्ड हायवेज च्या वतीने सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी आणि अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिेंदे, राज्यमंत्री मदन येरावार, प्रधान सचिव अशिष सिंह,  रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह  केंद्र तसेच राज्यातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या हातून राज्य आणि राष्ट्र निर्माणाचे उत्तम काम व्हावे ही अपेक्षा व्यक्त करून मुनगंटीवार यांनी गौरव झालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रस्त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. एकूण तरतूदीच्या ४५ टक्के रक्कमेची कामं महाराष्ट्रात होत आहेत.  सावित्री नदीवरचा पूल १६५ दिवसांच्या रेकॉर्ड टाईममध्ये बांधून वाहतूकीसाठी खुला करण्यात  आला. मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली आहे. मंत्री उत्तम आहेतच परंतू त्यांना साथ देणारी टीम उत्तम असेल तर विकासाच्या कामात कोणतेही अडथळे येत नाहीत. आज काही अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरव झाला आहे. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व अधिकाऱ्यांना अशी प्रमाणपत्रे मिळतील यादृष्टीने उत्तम काम व्हावे, ही अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

रस्त्यांच्या माध्यमातून विकास वेगाने पूर्णत्वाला- एकनाथ शिंदे

नितीन गडकरी राज्यात बांधकाम मंत्री असतांना त्यांनीच रस्ते विकास महामंडळाची निर्मिती करून अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केले. त्यामध्ये मुंबई- पुणे एक्सप्रेस वे असेल, मुंबईतील उड्डाण पूल असतील, त्यांचा समावेश आहे. राज्य आणि देशाचा विकास रस्त्यांच्या माध्यमातून वेगाने पूर्णत्वाला जातो. म्हणून हा राज्यातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचेही ते म्हणाले. रस्ते विकास महामंडळाकडे केंद्रीय बांधकाम मंत्रालयाने जवळपास ३ हजार कि.मी लांबीच्या रस्त्याचे काम दिले आहे,  ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण अतिशय जबाबदारीने काम करू असा विश्वास देत असल्याचेही ते म्हणाले. काल सत्कार झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये बांधकाम विभागाचे प्रधान सचिव अशिष सिंह, राधेश्याम मोपलवार, चीफ इंजिनिअर  अे.बी गायकवाड,  यांच्यासह २१ अधिकारी- अभियंत्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: The National Highway has increased four times in four years - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.