नाशिकमधील वडाळागावात ज्येष्ठ नागरिकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:00 IST2017-11-03T18:57:41+5:302017-11-03T19:00:57+5:30

nashik,Wadalagaon,Senior,citizen,murder | नाशिकमधील वडाळागावात ज्येष्ठ नागरिकाचा खून

नाशिकमधील वडाळागावात ज्येष्ठ नागरिकाचा खून

ठळक मुद्देकाठीने मारहाण ; उपचारादरम्यान मृत्यू इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल

नाशिक : काठीने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़३) पहाटे घडली़ नामदेव कडाजी लाखे ( ७०, रा़ म्हाडा कॉलनी, वडाळा गाव ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नामदेव लाखे हे गुरुवारी (दि़२) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वडाळा गावातील मांगीरबाबा मंदिरासमोरून जात होते़ यावेळी सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील संशयित गोरख पाराजी गायकवाड (३०) याने लाथ मारून लाखे यांना खाली पाडले़ यानंतर लाखे यांच्याचकडील काठी हिसकावून घेत त्यांच्या डोक्यावर काठीने मारहाण केली़ या मारहाणीमध्ये डोक्यास गंभीर मार लागलेल्या लाखे यांना तातडीने उपचारासाठी प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल केले़
मात्र, नामदेव लाखे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने शुक्रवारी (दि़३) पहाटे मुंबईत खासगी रुग्णालयासाठी हलविण्यात आले होते़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास लाखे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी संशयित गोरख गायकवाड विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,Wadalagaon,Senior,citizen,murder