अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 21:47 IST2017-09-30T21:43:03+5:302017-09-30T21:47:08+5:30

nashik,monor,girl,attempt,rape | अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देवडाळागावात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात बळजबरीने घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न पाच वर्षीय अल्पवयीन मुली ; पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

इंदिरानगर : वडाळा गाव परिसरात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात बळजबरीने घुसून संशयित उज्जेफ रऊफ शेख (२०,रा़वडाळागाव,नाशिक) याने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
इंदिरानगर पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरात झोपलेले होते़ यावेळी संशयित उज्जेफ शेख हा बळजबरीने घरात घुसला़ तसेच घरात झोपलेली पाच वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला़ या दरम्यान मुलीच्या वडील जागे झाल्याने त्यांनी आरडाओरड करताच संशयित शेखने पळ काढला़ यावेळी जमा झालेल्या नागरिकांनी शेखचा पाठलागही केला मात्र तो पळून गेला़
वडाळागाव परिसरातील संशयित उज्जेफ शेख हा अल्पवयीन मुलींना हेरून त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याची परिसरातील महिलावर्गाची तक्रार आहे़ याबाबत त्यांनी इंदिरानगर पोलिसांकडे चार-पाच वेळा लेखी तक्रारही केली़ शेख हा चाकूचा धाक दाखवित असल्याचे तसेच लहान मुलींना घरी एकटे सोडून जाणे मुश्किल झाल्याची कैफियत पोलिसांकडे मांडली होती़ मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने त्याची भीड चेपली होती़
दरम्यान, शुक्रवारी रात्री शेख हा नागरिकांच्या हातातून पळाला़ मात्र शनिवारी (दि़३०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडाळागावातील मनपा शाळेसमोर संशयित उज्जेफ शेख नागरिकांना दिसताच काहींना त्यास मारहाण केली़ सद्यस्थितीत त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इंदिरानगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: nashik,monor,girl,attempt,rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.