जिसका नाम है, वही बदनाम है - राधे माँ

By Admin | Updated: August 9, 2015 12:33 IST2015-08-09T12:33:07+5:302015-08-09T12:33:07+5:30

कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपामुळे गोत्यात आलेल्या वादग्रस्त अध्यात्मिक गुरु राधे माँ यांनी स्वतःवरील आरोप निराधार व खोटे असल्याचा दावा केला आहे.

The name of that is the same name - Radhe Ma | जिसका नाम है, वही बदनाम है - राधे माँ

जिसका नाम है, वही बदनाम है - राधे माँ

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ - कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपामुळे गोत्यात आलेल्या वादग्रस्त अध्यात्मिक गुरु राधे माँ यांनी स्वतःवरील आरोप निराधार व खोटे असल्याचा दावा केला आहे. जिसका नाम है, वही बदनाम है अशी फिल्मी प्रतिक्रियाही राधे माँ यांनी मुंबईत परतल्यावर दिली आहे. 
मुंबईत राहणा-या एका तरुणीने राधे माँविरोधात कौटुंबिक हिंसाचारांतर्गत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणानंतर औरंगाबादमध्ये गेलेल्या राधे माँ रविवारी सकाळी विमानाने मुंबईत परतल्या. राधे माँच्या भक्तांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यांच्या निवासस्थानाबाहेरही भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राधे माँ यांनी स्वतःवरील आरोप निराधार असल्याचा दावा केला.  हे त्यांचे कौटुंबिक प्रकरण आहे, मला याविषयी काहीही माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट केले. जिसका नाम होता है, वही बदनाम होता है अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: The name of that is the same name - Radhe Ma