ICSE 10th Result: आयसीएसई दहावीच्या परीक्षेत मुंबईची जुही कजारिया देशात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 07:09 AM2019-05-08T07:09:35+5:302019-05-08T07:09:39+5:30

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने दहावी (आयसीएसई) व बारावीचा (आयएससी) निकाल मंगळवारी दुपारी जाहीर केला.

 Mumbai's Juhi Kajaria is the first in the ICSE Class X examination | ICSE 10th Result: आयसीएसई दहावीच्या परीक्षेत मुंबईची जुही कजारिया देशात पहिली

ICSE 10th Result: आयसीएसई दहावीच्या परीक्षेत मुंबईची जुही कजारिया देशात पहिली

Next

मुंबई/ठाणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने दहावी (आयसीएसई) व बारावीचा (आयएससी) निकाल मंगळवारी दुपारी जाहीर केला. मुंबईच्या जमनाबाई नरसी शाळेची जुही कजारिया व पंजाबच्या मुक्तसरमधील विद्यार्थी मनहर बन्सल या दोघांनी ९९.६० टक्के गुण मिळवीत आयसीएसई १० वी परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला. तर बारावीच्या परीक्षेत मुंबईतील सेंट जॉर्ज हायस्कूलची मिहिका सामंत हिने ९९.७५ टक्के गुण मिळवत देशात दुसरी येण्याचा मान पटकावला आहे.
आयसीएसई दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलची फोरम संजनवाला, गुंडेचा एज्युकेशन अ‍ॅकॅडमीची अनुश्री चौधरी, चिल्ड्रन्स अ‍ॅकॅडमीची अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याच्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचा यश भन्साळी या चौघांनी ९९.४० टक्के गुण मिळवत संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला. तर ९९.२० टक्के गुण मिळवत मुंबईतील द कॅथेड्रल अ‍ॅण्ड जॉन कॅनॉन स्कूलचा वीर बन्सल, जमनाबाई नरसी स्कूलचा जुगल पटेल, मानेकजी कुपर एज्युकेशन ट्रस्टचा करण अंद्रादे, विबग्योर हायस्कूलचा झरवान श्रॉफ, रायन इंटरनॅशनल स्कूलचा हुसैन बसराई, बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा अमन झवेरी, पी.जी. गरोडीया स्कूलचा हर्ष व्होरा आणि ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलचा ओजस देशपांडे आणि आदित्य वाकचौरे हे नऊ जण देशात तिसरे (पान १ वरून) आले. देश व परदेशातील आयसीएसई दहावी निकाल ९८.५४ टक्के आयएससी १२ वीचा निकाल ९६.५२ टक्के लागला आहे. त्यामध्ये महाराष्टÑाचा निकाल सरस असून महाराष्टÑातून दहावीचा निकाल ९९.८५ टक्के तर बारावीचा निकाल ९९.२७ टक्के इतका विक्रमी लागला आहे. यंदा आयसीएसई १० वीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान आणि आयएससी १२ वीची परीक्षा ४ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली आहे.
ठाण्याचा १०० टक्के निकाल
ठाण्यातील सीबीएसई शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असताना आयसीएसईमध्येही शंभर टक्केच निकाल लागला. ठाण्यात आयसीएसईच्या सहा शाळा असून यात ज्ञानगंगा, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, युनिव्हर्सल स्कूल, हिरानंदानी, लोढा वर्ल्ड स्कूल, बिलॉबॉँग यांचा समावेश आहे.
कोलकाताच्या देवांग कुमार अग्रवाल व बंगळुरूच्या विभा स्वामीनाथन या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवीत १२ वी आयएससीच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावरील १६ विद्यार्थ्यांना ९९.७५ टक्के, तर तिसरा क्रमांक पटकाविलेल्या ३६ विद्यार्थ्यांना ९९.५० टक्के गुण मिळाले आहेत.

नाशिकची दृष्टी देशात तिसरी
नाशिकच्या विस्डम इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी दृष्टी अत्तरदे ही ९९.२० टक्के गुण मिळवून देशात तिसºया क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
शहरातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, ९५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवून भरारी घेतली आहे. यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे.

सिंघानिया शाळेची चमकदार कामगिरी
आयएससी बारावीच्या परीक्षेतदेखील ठाणे येथील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेने चमकदार कामगिरी केली आहे. वाणिज्य शाखेची श्रेया राज आणि विज्ञान शाखेची निमिष वाडेकर यांनी ९९.५०% मिळवत देशात तृतीय तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला. ह्युमॅनिटीज शाखेची कीर्तना जगन्नाथन आणि मिसबाह वाजीद अन्सारी तसेच वाणिज्य शाखेची जयानी शाह यांनी ९९.२५% मिळवून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला.

नागपूरचा श्रीनभ देशात तिसरा
नागपूरच्या चंदादेवी सराफ विद्यालयाचा श्रीनभ अग्रवाल या विद्यार्थ्याने ९९.२० टक्के गुण प्राप्त करीत देशात तिसरे स्थान पटकाविले आहे. श्रीनभ हा विदर्भासह महाराष्टÑातही प्रथम स्थानावर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय याच शाळेतील प्रेक्षा यादव या विद्यार्थिनीने ९८ टक्के गुण घेत विदर्भात दुसरे तर सामिया अन्सारी या विद्यार्थिनीने ९६.८ टक्के गुण मिळवत तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
पुण्याचा निकाल १००% : पुण्यातील आयसीएसई बोर्डाच्या शाळांचे निकाल १०० टक्के लागला असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत चांगले यश मिळवले आहे. ठाण्यातील सर्व सहा शाळांचाही शंभर टक्के निकाल लागला.

दहावीमध्ये ९९ टक्क्यांनी पास झाल्याने घरात आनंद साजरा करण्यात आला. पुढे सीएचे शिक्षण घेण्याचा विचार आहे. मी सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत सकाळी पाच वाजता निकाल जाहीर झाला होता. त्या वेळी मी झोपेत होतो. आईने उठवून ९९ टक्के मिळाल्याचे सांगितल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
- जुगल पटेल, जमनाबाई नरसी स्कूल

दहावीमध्ये ९९.२० टक्के मिळाल्यामुळे खूप खूश आहे. आई-वडीलदेखील आनंदोत्सव साजरा करत आहेत. आजी-आजोबासुद्धा घरी आले आहेत. पुढे इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेण्याचा विचार आहे. इंजिनीअरिंगमध्ये आयटी विभागात प्रवेश घेण्याचा मानस आहे.
- झरवान श्रॉफ, विबग्योर हायस्कूल

दहावीनंतर इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आयआयटी हा माझा टार्गेट आहे. माझे गुगल कंपनीमध्ये काम करण्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यायची आहे. आई-वडिलांसह नातेवाइक आनंदी आहेत.
- फोरम संजनवाला,
जमनाबाई नरसी स्कूल

खूप आनंद झाला आहे. मी जी मेहनत घेतली त्याचे आज फळ मिळाले. मला ९८ ९८.५ टक्के मिळतील असे वाटले होते. परंतु, ९९.२ टक्के मिळाल्याने सुखद धक्काच बसला. २०१८ साली स्वयम दास गुणवत्ता यादीत चमकला होता, त्याचा आदर्श मी डोळ््यांसमोर ठेवून अभ्यास केला.
- ओजस देशपांडे, सिंघानिया हायस्कूल, ठाणे

निकाल पाहून आनंद झाला आहे, त्यांचे कौतुकच आहे. विद्यार्थ्यांची मेहनत त्यांना पुढे नेत राहो हीच सदिच्छा. विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
- रेवती श्रीनिवासन, मुख्याध्यापिका,
सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल

इतके टक्के मिळतील,अशी अपेक्षा नव्हती. परंतू निकाल पाहिला आणि आश्चर्याचा धक्काच बसला, पुढे इंजिनिअरिंग करण्याची इच्छा आहे.
- आदित्य वाकचौरे,
सिंघानिया हायस्कूल, ठाणे
 

Web Title:  Mumbai's Juhi Kajaria is the first in the ICSE Class X examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.