मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील निचांकी तापमान, राज्यात पारा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 12:19 PM2018-01-08T12:19:34+5:302018-01-08T12:25:11+5:30

मुंबई, पुणे, नाशिकसह सध्या राज्यात थंडीचा कडाका बराच वाढला आहे.

In Mumbai, the minimum temperature of this season dropped, the state lost its mercury | मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील निचांकी तापमान, राज्यात पारा घसरला

मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील निचांकी तापमान, राज्यात पारा घसरला

Next

मुंबई- मुंबई, पुणे, नाशिकसह सध्या राज्यात थंडीचा कडाका बराच वाढला आहे. मुंबईत आज निचांकी म्हणजे 13.6 इतकं तापमान आहे. रविवारी 13.8 तापमान होतं. निफाडचं आजचं तापमान तर 7.4 अंशावर आलं आहे. तर पुण्याचा पाराही 9 अंशावर पोहोचला आहे.
थंडीने मुंबईकरांची रविवारची पहाटही गारेगार केली आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आहे. वाढत्या थंडीने मुंबईकर अक्षरश: कुडकुडले आहेत.

विशेष म्हणजे, मुंबईत दिवसाही गार वारे वाहात असल्याने, मुंबईकर खऱ्या अर्थाने हिवाळा अनुभवत आहेत. रविवारी नोंदविण्यात आलेले १३ अंश हे किमान तापमान या मोसमातील आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कुलाबा वेधशाळेत किमान तापमानाची नोंद १७.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ वेधशाळेत किमान तापमानाची नोंद १३.८ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ८ अंश नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ८ ते ११ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ८ आणि ९ जानेवारी रोजी मुंबईचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हुडहुडी भरली!; नाशिक नीचांकी
किमान तापमानात पुन्हा झपाट्याने घट झाल्याने राज्यात हुडहुडी जाणवू लागली आहे़ पुढील दोन दिवस गारठा असाच कायम राहणार आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सर्वात कमी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जाण्याची भीती आहे.

नाशिक जिल्ह्यात सकाळी बोचरी थंडी जाणवते. खान्देशातही थंडीचा कडाका असून जळगावला ८.२ अंश सेल्सिअस तापमान होते. मुंबईकरांचा रविवारही गारेगार होता. रविवारी मुंबईचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस होते. दिवसाही गार वारे वाहत असल्याने मुंबईकर ख-या अर्थाने हिवाळा अनुभवत आहेत.

Web Title: In Mumbai, the minimum temperature of this season dropped, the state lost its mercury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.