"आधी तिकीट बूक करा मग पैसे द्या"
By admin | Published: May 31, 2017 08:34 PM2017-05-31T20:34:27+5:302017-05-31T20:34:27+5:30
RCTC ने ‘बाय नाऊ, पे लेटर’ ही नवी सेवा सुरू केली आहे. या नव्या सेवेनुसार रेल्वेचं तिकीट बूक करुन नंतर पैसे देता येतील.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31- भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC ने प्रवाशांसाठी नवा पर्याय आणला आहे. IRCTC ने ‘बाय नाऊ, पे लेटर’ ही नवी सेवा सुरू केली आहे. या नव्या सेवेनुसार रेल्वेचं तिकीट बूक करुन नंतर पैसे देता येतील. ई-पे लेटरच्या सहयोगाने IRCTC ने ही सुविधा सुरू केली आहे. महत्त्वाचं म्हणजे तिकीट बूक केल्यानंतर 14 दिवसात कधीही पेमेंट करता येणार आहे. यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन पेमेंट करावं लागेल. .‘बाय नाऊ, पे लेटर’ या नव्या सुविधेमुळे तिकीट बूक करताना अडथळा ठरणाऱ्या मोठ्या पेमेंट प्रोसेसपासून लोकांना सूट मिळणार आहे.
IRCTC च्या ‘बाय नाऊ, पे लेटर’ सुविधेचा वापर करण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्डची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर प्रवाशांना तिकीट बूक करता येणार आहे. यापूर्वी IRCTC ने तिकिटासाठी कॅश ऑन डिलीव्हरी सेवा सुरु केली आहे. तिकीट बूक केल्यानंतर तुम्ही ते घरी मागवू शकता. त्यानंतर पेमेंट कार्ड किंवा कॅशद्वारे करु शकता, अशी सुविधा होती. IRCTCमध्ये दिवसाला सहा लाख व्यवहार होतात. यापैकी पाच टक्के तरी व्यवहार पुढील सहा महिन्यात या नव्या सुविधेकडे आणण्याचा मानस आहे, असं इ-पे लेटरकडून सांगण्यात आलं आहे.
"बाय नाऊ, पे लेटर" या सेवेशी ग्राहकाला जोडण्याआधी त्या ग्राहकाचे IRCTC बरोबर झालेले आधीचे व्यवहार तपासले जातील, असं इ-पे लेटरचे सह-संस्थापक अक्षत सक्सेना म्हणाले आहेत.
इ-पे लेटर या संस्थेची स्थापना डिसेंबर 2015 साली मुंबईत झाली होती. आता ही संस्था IRCTC सह नवी सुविधा ग्राहकांसाठी घेऊन आली आहे.