स्वच्छतेत महाराष्ट्र देशात तिसरे; मात्र प्रमुख शहरांची घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 06:12 AM2019-03-07T06:12:00+5:302019-03-07T06:12:14+5:30

स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला खरा;

Maharashtra is third in cleanliness; However, the downfall of major cities | स्वच्छतेत महाराष्ट्र देशात तिसरे; मात्र प्रमुख शहरांची घसरगुंडी

स्वच्छतेत महाराष्ट्र देशात तिसरे; मात्र प्रमुख शहरांची घसरगुंडी

Next

मुंबई : स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला खरा; परंतु मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या प्रमुख महानगरांचा क्रमांक यंदा घसरला आहे. केवळ नवी मुंबई महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली असून राष्टÑीय पातळीवर नवी मुंबईने सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गतवर्षी हे शहर नवव्या क्रमांकावर होते.
केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९' चे निकाल बुधवारी घोषित केले. छत्तीसगडने पहिला क्रमांक पटकावला, तर झारखंड दुसऱ्या स्थानी आहे. मध्य प्रदेशमधील इंदुर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. इंदुरने हा मान सलग तीनवेळा मिळवला आहे. महाराष्ट्राचा पुरस्कार स्वच्छ भारत मिशनच्या संचालक मनीषा म्हैसकर यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. देशातील पहिल्या २० शहरांमध्ये नवीमुंबई आणि कोल्हापूरचा समावेश आहे. तर उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा देशात अव्वल ठरली असून, राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.
यंदाही नागपूरची घसरण
स्वच्छेत गत वर्षी ५५ क्रमांकावर असलेला नागपूरचा क्रमांक ५८ वर पोहचला. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असताना, स्वच्छतेच्या बाबतीत स्थानिक प्रशासन अपेक्षित उपाययोजना करू न शकल्याने नागपूर पुन्हा तीन अंकाने पिछाडीवर गेले. नागपूरच्या घसरणीला घणकचरा व्यवस्थापन कारणीभूत ठरले आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात मनपा अपयशी ठरली आहे.
सोलापुरात सुधारणा
स्वच्छता सर्वेक्षणात गतवर्षी ८६ व्या स्थानी असलेली सोलापूर महापालिकेने यंदा ५४ व्या क्रमाकांवर मजल मारली आहे. महापालिकेच्या वतीने भोगाव येथील कचरा डेपोच्या जागेवर बायोएनर्जी प्रकल्प राबविला जातो. त्याचेही जादा गुण मिळाले.
कोल्हापूर सुधारतेय
शहर स्वच्छ ठेवण्याकरिता सामूहिकरीत्या व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या जोरावर कोल्हापूर शहराने १६ वा क्रमांक मिळविला आहे. गतवर्षी ७४ वा क्रमांक आला होता. पश्चिम व दक्षिण महाराष्टÑातील कोल्हापूर शहर हे प्रमुख शहर मानले जाते. या शहराचा भौगोलिक विस्तार झाला नसला तरी सुविधांमध्ये बºयाच सुधारणा होत आहेत.
पुणे इथेही उणे!
‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ च्या सर्वेक्षणामध्ये पुणे महापालिकेचा स्वच्छतेच्या मानांकनाचा टक्का घसरला असून, दहा लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये पुणे महापालिकेला १४ वा क्रमांक मिळाला. गत वर्षी दहावा क्रमांक मिळाला होता. महापालिकेने थ्री स्टार मानांकनासाठी अर्ज केला होता, परंतु यासाठी अपेक्षित पात्रता पूर्ण न केल्याने २०० गुण कमी झाले. खासगी संस्थेने योग्य पद्धतीने डॉक्युमेंटेशन न केल्याने पुणे महापालिकेचा स्वच्छतेचा टक्का घसरल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकचाही नंबर घसरला
स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक क्रमांक टॉप टेनमध्ये येणार असल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी स्वच्छतेत सलग दुसºया वर्षीदेखील नाशिकचा क्रमांक घसरला आहे. गेल्यावर्षी नाशिकचा क्रमांक ६३ होता आता तो ६७ झाला आहे. हगणदारीमुक्ती तसेच सेवास्तराचे गुणांकन घसरल्याने महापालिकेला मोठा फटका बसला आहे.
औरंगाबादची कचराकोंडी
स्वच्छ भारत अभियानात मागीलवर्षी देशभरात १२८ वा क्रमांकावर असलेल्या औरंगाबादला यंदा २२० व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १६ फेब्रुवारी २०१७ पासून औरगाबाद शहरात अभुतपूर्व कचरा कोंडी सुरू आहे. राज्य शासनाकडून ९० कोटींचे अनुदान मिळाल्यानंतरही कचरा प्रक्रियेत महापालिकेने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. या कचराकोंडीमुळेच शहराचा क्रमांक घसरला आहे.
>अस्वच्छतेत आघाडी
शहर 2019 2018
पुणे 14 10
मुंबई 49 18
नागपूर 58 55
नाशिक 67 63
औरंगाबाद 220 128
>महाराष्टÑाची कामगिरी घनकचरा व्यवस्थापनात
लातूर देशात अव्वल
नवी मुंबईत नागरिकांचा सर्वाधिक सहभाग
कोल्हापुर जिल्ह्यातील
पन्हाळा देशात १७ वे
अहमदनगर छावणी
मंडळ नाविण्यपूर्ण
पश्चिम विभागात लोणावळा दुसºया क्रमांकाचे
स्वच्छ शहर
दक्षिण विभागात कºहाड प्रथम, तर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तिसºया स्थानी
इस्लामपूरनेही
पटकावला पुरस्कार 50 हजार लोकसंख्येच्या शहरात वीटा (सांगली), इंदापूर (पुणे) व देवळाली प्रवरा (अहमदनगर) या तीन शहरांनी पटकावले बक्षीस 25हजार लोकसंख्येच्या शहरात मौदा, मलकापूर आणि पोभर्णाचा समावेश
>मुंबईचा स्वप्नभंग!
ओला व सुका कचरा वर्गीकरण, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच कचºयावर प्रक्रिया तसेच घरोघरी जाऊन कचरा उचलण्याच्या मोहिमेनंतरही केंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेची घसरण झाली आहे. सन २०१८ मध्ये १८ व्या क्रमांकावर असलेल्या मुंबईची स्वच्छतेच्या परीक्षेत यंदा पिछेहाट झाली आहे. थ्री स्टार रेटिंगची स्वप्न पाहणारी मुंबई चक्क ४९ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मात्र मरीन ड्राइव्ह येथे गेल्या वर्षी बांधलेले वातानुकूलित प्रसाधनगृह सर्वोत्कृष्ट तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला आहे. यासोबतच वांद्रे येथील नागरिकांच्याच पुढाकाराने उभारण्यात आलेल्या कचºयापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाचेही कौतुक झाले असल्याचे सहायक आयुक्त किरण दिग्गवकर यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra is third in cleanliness; However, the downfall of major cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.