गारठा होतोय कमी, अनेक शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:12 AM2019-02-13T03:12:54+5:302019-02-13T03:13:05+5:30

अकरा अंशावर घसरलेल्या मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे.

Low-rate horticulture, the minimum temperature of many cities is 15 degrees | गारठा होतोय कमी, अनेक शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर

गारठा होतोय कमी, अनेक शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर

Next

मुंबई : अकरा अंशावर घसरलेल्या मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असल्याने दिवसाच्या हवेतील गारवा कमी झाला असून, रात्रीच्या हवेत मात्र किंचित गारवा आहे. दुसरीकडे राज्यातील शहरांचे किमान तापमानही आता वाढू लागले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १७.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ११ अंश नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. डहाणू, अहमदनगर, कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या शहरांचे किमान तापमान १५ अंशावर पोहोचले आहे. बुधवारसह गुरुवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २२ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
आज मध्य महाराष्टÑात पावसाची शक्यता
१३ फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
१४ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
१५ फेब्रुवारी : विदर्भात काही ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
१६ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल.

 

Web Title: Low-rate horticulture, the minimum temperature of many cities is 15 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान