१० जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; कोकण विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 04:44 AM2018-07-30T04:44:43+5:302018-07-30T04:44:53+5:30

कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पावसामुळे यापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र त्याचवेळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे.

Less than average rainfall in 10 districts; More than average rainfall in Konkan division | १० जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; कोकण विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

१० जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; कोकण विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

Next

पुणे : कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पावसामुळे यापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र त्याचवेळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे़ पर्जन्यछायेतील प्रदेशात अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता आहे़ मध्य महाराष्ट्रातील ५ जिल्हे, मराठवाड्यातील ४
जिल्हे आणि विदर्भातील एका जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला आहे़
राज्यातील हवामान विभागापैकी कोकण विभागात २९ जुलैअखेर सरासरीच्या १८ टक्के पाऊस जास्त झाला असून, मध्य महाराष्ट्रात १५ टक्के अधिक पाऊस झाला आहे; पण मराठवाड्यात सरासरीच्या ४ टक्के पाऊस कमी आहे़ विदर्भात तो १६ टक्के अधिक झाला आहे़
पालघरमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथे सरासरीपेक्षा ५० टक्के अधिक पावसाची नोंद झाली़ ठाणे जिल्ह्यात ४९ टक्के, मुंबई उपनगर भाग आणि पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ४८ टक्के अधिक पाऊस झाला आहे़
सध्या पावसाने ओढ दिल्याने या जिल्ह्यांमधील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ पावसाच्या असमतोल वितरणाचा मराठवाडा व मध्य महाराष्ट्राला फटका बसत असल्याचे दिसत आहे़

- मध्य महाराष्ट्रातील धुळे
(-१६ टक्के), जळगाव
(-५ टक्के), नंदुरबार (-२३ टक्के), सांगली (- २२ टक्के), सोलापूर (-१२ टक्के) कमी पाऊस झाला आहे़ मराठवाड्यातील औरंगाबाद (-२८ टक्के), बीड
(-१४ टक्के), जालना (-२६ टक्के) आणि परभणी (- ५ टक्के) कमी पावसाची नोंद झाली आहे़ विदर्भातील बुलढाणा येथे आतापर्यंत सरासरीच्या (- १९ टक्के) पाऊस कमी झाला आहे़

३० जुलै रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची
शक्यता आहे़
३१ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़

Web Title: Less than average rainfall in 10 districts; More than average rainfall in Konkan division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस