देशातील खासदारांमध्ये कोल्हापुरचे धनंजय महाडिक अव्वल

By Admin | Updated: March 6, 2017 14:11 IST2017-03-06T14:11:45+5:302017-03-06T14:11:45+5:30

dhnanjay, mhahadik, kolhapur, number one,

Kolhapur's Dhananjay Mahadik tops the list of MPs of the country | देशातील खासदारांमध्ये कोल्हापुरचे धनंजय महाडिक अव्वल

देशातील खासदारांमध्ये कोल्हापुरचे धनंजय महाडिक अव्वल

देशातील खासदारांमध्ये कोल्हापुरचे धनंजय महाडिक अव्वल
कोल्हापूर : देशातील खासदारांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांमध्ये कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक अव्वल ठरले आहेत. यापूर्वी हा मान खासदार सुप्रिया सुळे यांनी मिळविला होता. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर खासदार महाडिक यांना हा मान मिळालेला आहे.
महाडिक म्हणाले, लोकसभेत विविध प्रश्न मांडण्यासाठी त्यांचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीवर प्रश्न तयार करून ते विचारण्यासाठी पद्धत आहे. सुमारे तीनशे ते साडेतीनशे प्रश्नांची यादी दिली जाते, त्यातून लॉटरी पद्धतीने देशभरातील खासदारांच्या प्रश्नांची यादी अंतिम केली जाते. यावेळच्या अधिवेशनात देशातील सर्व खासदारांमधून माझे ७५0 प्रश्न सभागृहात आले आणि देशातील सर्व खासदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडणारा म्हणून माझे नाव पुढे आल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur's Dhananjay Mahadik tops the list of MPs of the country