मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 06:25 PM2018-11-18T18:25:12+5:302018-11-18T18:25:34+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा अधिवेशनानिमित्त पत्रकार परिषद घेतली.

Independent category for Maratha community; Chief Minister's announcement | मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग; मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext

मुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला असून सामाजिक आर्थिक मागास वर्ग या प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा अधिवेशनानिमित्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला सामाजिक आर्थिक मागास वर्ग या प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी याच अधिवेशनात कायदा करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ उपसमिती आरक्षणाचे स्वरूप ठरवणार आहे. 


मराठा समाजासाठी विशेष प्रवर्ग तयार करण्यात आला आहे. सामाजिक आर्थिक मागास वर्ग (Socialy economiclay backward class) हा प्रवर्ग आहे. मराठा समाजाला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास ठरवल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम 15.4 व 16.4 मधील तरतुदीनुसार हा समाज आरक्षणासाठी पात्र आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Web Title: Independent category for Maratha community; Chief Minister's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.