सरकार आल्यास मुंडेंच्या हत्येची चौकशी करू- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:12 AM2019-02-01T05:12:09+5:302019-02-01T05:13:01+5:30

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघातात झाला की ती हत्या होती, याची चौकशी आमचे सरकार आल्यानंतर केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

If the government comes to investigate the murder of Munde - Jayant Patil | सरकार आल्यास मुंडेंच्या हत्येची चौकशी करू- जयंत पाटील

सरकार आल्यास मुंडेंच्या हत्येची चौकशी करू- जयंत पाटील

googlenewsNext

कर्जत (अहमदनगर) : सध्याचे सरकार सर्व व्यवस्था गुंडाळण्याचे काम करीत आहे. इव्हीएम मशिन हॅक होतात. ते एका नेत्याला माहीत होते आणि त्यांचा अपघात होतो, हे हॅकर स्वत: सांगत आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघातात झाला की ती हत्या होती, याची चौकशी आमचे सरकार आल्यानंतर केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

कर्जत येथे आयोजित परिवर्तन मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. जनतेला फसविणारी टोळी दिल्ली आणि मुंबईत सरकार म्हणून बसली आहे. तिजोरीत पैसा नाही आणि घोषणांचा पाऊस आहे, अशा शब्दात पाटील यांनी सरकारवर टीका केली़ यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे उपस्थित होते.

धनंजय मुंडे म्हणाले, आजची परिस्थिती पाहता मोदींच्या अच्छे दिनाची गल्ली ते दिल्ली चेष्टा झाली आहे. फसविल्यानंतरही काही भक्त आचारसंहितेच्या आधी १५ लाख खात्यावर येतील या आशेवर आहेत. आता निवडणुका लागल्या नसत्या तर पेट्रोलने शतक गाठले असते.

Web Title: If the government comes to investigate the murder of Munde - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.