मी आमदार होणारच - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 17:48 IST2017-11-27T16:35:59+5:302017-11-27T17:48:20+5:30
मी लवकरच आमदार होणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.

मी आमदार होणारच - नारायण राणे
मुंबई - जूनच्या आधी काहीही होऊ शकते, त्यामुळे लवकरच आमदार होणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. भाजपानं घेतलेली भूमिका मला मान्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्रीपद मिळणार का? याबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
पुढे बोलताना राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला ते म्हणाले की, विधान परिषदेसाठी जर मी उमेदवार असतो तर शिवसेनेमध्ये फूट पडली असती त्यामुळे शिवसेनेनं माझ्या उमेदवारीला विरोध केला. सध्या माझ्याविरोधात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत.
तरीही राणें मंत्रीमंडळात?
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचा पत्ता कापून भाजपाने विधान परिषदेसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली. आज त्यांनी मात्र तरीही राणेंना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळणार असल्याचं कळतंय. शिवसेनेचा नारायण राणेंबद्दलचा रोष पाहता हा निर्णय घेण्यात आला. मात्र राणेंना मंत्रिपद देऊन त्यांना 6 महिन्यात निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. येत्या जुलैमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या 12 जागांमध्ये राणेंची वर्णी लागू शकते. तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून नारायण राणेंना देण्यात आल्याचं कळतंय.
राणेंना उमेदवारी का नाही ?
- राणे शिवसेनेचे कट्टर विरोधक
- राणेंना उमेदवारी दिली असती तर शिवसेनेचा पाठिंबा मिळाला नसता
- काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली होती
- राणेंना आधी मंत्री करून मग निवडून आणता येऊ शकतं
- आता मंत्री केलं तर जूनपर्यंत वेळ मिळेल
- जूनमधल्या वि.प. निवडणुकीत भाजपचा विजय सहज शक्य
- शिवसेनेला नाराज न करता राणेंचंही समाधान करता येईल