हॅलिकॉप्टरचा निर्माता औद्योगिकनगरीच्या आश्रयाला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 02:21 PM2018-09-25T14:21:23+5:302018-09-25T14:27:31+5:30

प्रदीपने शालेय शिक्षण सोडल्यानंतर अभियांत्रिकीची आवड असल्याने जीप, ट्रॅक्टर, मोटार दुरूस्ती करण्याचे गॅरेज सुरु केले. ते करत असतानाच त्याने संपूर्ण भारतीय बनावटीचे हॅलिकॉप्टर तयार करण्याचा निर्धार केला.

The helicopter manufacturer in pimpri chinchwad | हॅलिकॉप्टरचा निर्माता औद्योगिकनगरीच्या आश्रयाला 

हॅलिकॉप्टरचा निर्माता औद्योगिकनगरीच्या आश्रयाला 

Next
ठळक मुद्देसंशोधनासाठी हवे आर्थिक पाठबळ पहिल्या हॅलिकॉप्टरचे वजन ७०० किग्रॅ आणि आता बनविलेल्या हॅलिकॉप्टरचे वजन २५० किग्रॅ ड्रोन, फ्लाइंग कार तसेच भारतीय सैन्यासाठी सुरक्षित कम्वो हॅलिकॉप्टर बनविण्याची जिद्दप्रदीपने आतापर्यंत जवळपास बनविले ७ हॅलिकॉप्टर येणाऱ्या पैशाचा हॅलिकॉप्टरच्या संशोधनासाठी वापर करावा हा उद्देश

पिंपरी : तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकानजीक असलेल्या मोटार गॅरेजमध्ये उभे असलेले एक हॅलिकॉप्टर जाणाऱ्या  येणाऱ्या प्रवाशांचे चटकन लक्ष वेधून घेत आहे. कित्येक जिज्ञासू प्रवासी त्या गॅरेजमध्ये जात हॅलिकॉप्टर निरखून पाहत आहेत. हे हॅलिकॉप्टर खरे की खोटे, ते उडणारे आहे की धावणारे, कसे उडते ..? असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधचा प्रयत्न प्रवासी करत आहेत. जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या सांगली येथील प्रदीप मोहिते निर्मित हॅलिकॉप्टरची ही गोष्ट .... 

  प्रदीपने शालेय शिक्षण सोडल्यानंतर अभियांत्रिकीची आवड असल्याने जीप, ट्रॅक्टर, मोटार दुरूस्ती करण्याचे गॅरेज सुरु केले. ते करत असतानाच त्याने संपूर्ण भारतीय बनावटीचे हॅलिकॉप्टर तयार करण्याचा निर्धार केला. प्रदीप मोहिते मूळचा वांगी ता.कडेगाव,त्यासाठी तन, मन, धन लावून हॅलिकॉप्टर बनविले आणि ते उडविले सुद्धा. हळूहळू एका पाठोपाठ नवनवीन सुधारणा करत प्रदीपने आतापर्यंत जवळपास ७ हॅलिकॉप्टर बनविले आहेत, पहिल्या हॅलिकॉप्टरचे वजन ७०० किग्रॅ होते आणि आता बनविलेल्या हॅलिकॉप्टरचे वजन २५० किग्रॅ आहे. हॅलिकॉप्टर बनविण्यासाठी त्याने दिवसा गॅरेजमध्ये व रात्री हॅलिकॉप्टर बनविण्यासाठी मेहनत घेतली आहे. सध्या त्याने बनविलेले हॅलिकॉप्टरमध्ये ३०० फुटांपर्यंत उंच उड्डाण घेऊ शकत असल्याचे तो सांगतो.
    प्रायोगिक तत्वावर निर्मित सेवन फायटरमध्ये सुधारणा गरजेची 
सेवन फायटर हॅलिकॉप्टरमध्ये अजून आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. परंतु संशोधन करण्यासाठी आर्थिक पाठबळ असायला हवे..? हॅलिकॉप्टर बनविण्याच्या हौसेने झपाटलेल्या प्रदीपला कुटुंबाच्या खर्चाची काळजी आहे. त्यामुळे संशोधनाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीत गॅरेजच्या व्यवसायात जम बसेल. त्यातून येणाऱ्या पैशाचा हॅलिकॉप्टरच्या संशोधनासाठी वापर करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मोठ्या आशेने औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलो. राज्यशासन, केंद्रशासन यांनी मेक इन इंडिया अंतर्गत हॅलिकॉप्टरच्या संशोधनास मदत करावी. तसेच एखाद्या उद्योजकाने माझ्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला आर्थिक पाठबळ द्यावे ही अपेक्षा असल्याचे हॅलिकॉप्टर मॅन प्रदीप मोहिते याने सांगितले.
........................
आतापर्यंत प्रदिपने बनविलेल्या हॅलिकॉप्टरच्या 
सॉस प्लेट, इंजिन, ऑटोमॅटीक क्लच, पायलट ट्रेनिंग ब्रॅकेट, चेन ड्राइव्ह या पार्टला पेटंट मिळाले असून यासाठी वकील असलेल्या मावशी उर्मिला जाधव यांनी मदत केली आहे. 
...........
पुढील योजना
ड्रोन, फ्लाइंग कार तसेच भारतीय सैन्यासाठी सुरक्षित कम्वो हॅलिकॉप्टर बनविण्याची जिद्द प्रदीप मोहिते या तरूणाने बाळगलेली आहे.

Web Title: The helicopter manufacturer in pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.