आरोग्यमंत्र्यांच्या सचिवाचे महिला डॉक्टरबरोबर अश्लील संभाषण ?

By Admin | Updated: June 20, 2016 17:43 IST2016-06-20T17:12:20+5:302016-06-20T17:43:43+5:30

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांच्याविरोधात महिलेशी अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार दाखल झाली

Health minister's secretive conversation with a doctor? | आरोग्यमंत्र्यांच्या सचिवाचे महिला डॉक्टरबरोबर अश्लील संभाषण ?

आरोग्यमंत्र्यांच्या सचिवाचे महिला डॉक्टरबरोबर अश्लील संभाषण ?

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांच्याविरोधात महिलेशी अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. सुनील माळी यांनी अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार जळगावातील एका महिला डॉक्टरनं केली असून, तक्रारदार महिलेनं यासंदर्भात आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगाचं कथन केल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 
या आधी सुनील माळी यांच्याविरोधात लाच घेतल्याचा आरोपही दाखल झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आरोग्यमंत्र्यांचे सचीव सुनील माळी लाखो रुपयांची लाच घेतात, असा आरोप डॉ. राहुल घुले यांनी केला असून, यासंदर्भात राहुल घुलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. सुनील माळी हे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासोबत नेहमीच असतात. या आरोपांमुळं आरोग्यमंत्र्यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.

Web Title: Health minister's secretive conversation with a doctor?