सचिन तेंडुलकरच्या निधीतून बदलणार आरेच्या आदिवासी पाड्यातील रस्त्यांचा चेहरामोहरा
By Admin | Published: March 27, 2017 11:11 PM2017-03-27T23:11:10+5:302017-03-27T23:11:10+5:30
सचिन तेंडुलकरच्या खासदार निधीतूंन गोरेगाव (पूर्व )आरे येथील आदिवासी जिवाच्या पाड्यातील रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
मनोहर कुंभेजकर/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - एकीकडे आरेतील आदिवासी पाड्यात मूलभूत सुविधा आणि रस्त्यांच्या अभाव असताना देशातील तमाम क्रिकेट रसिकांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खासदार निधीतूंन गोरेगाव (पूर्व )आरे येथील आदिवासी जिवाच्या पाड्यातील रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
राज्यसभा खासदार असलेल्या सचिन तेंडुलकरच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आरे कॉलनी येतील आदर्शनगर ते आदिवासी जिवाचा पाडा येथे सिमेंट कॉर्किटकरणं होणार आहे. या रस्त्यांचे बांधकाम कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प आरे विभाग हे काम करणार आहे.
याकरिता नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे यांच्या ३ वर्षांच्या पाठपुराव्यामुळे सदरचे काम उद्या गुढीपाडव्याला सुरू करण्यात येणार आहे. सदर काम पूर्ण झाल्यावर स्वता सचिन तेंडुलकर यांनी या रस्त्यांचे लोकार्पण करण्याची मागणी येथील आदिवासी बांधवांनी केली आहे. या कामाबद्दल खासदार तेंडुलकर व कुमरे यांचे विभागातील जनतेने आभार मानले आहेत.