येत्या 5 जूनपासून अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया
By admin | Published: May 31, 2017 09:15 PM2017-05-31T21:15:16+5:302017-05-31T21:15:16+5:30
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ५ जूनपासून याला प्रारंभ
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 31 - तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ५ जूनपासून याला प्रारंभ होणार आहे. राज्यभरातील महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया ‘कॅप’ मार्फत राबवली जाईल. मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणा-या जागा भरण्याचे आव्हान यंदा महाविद्यालयांसमोर आहे. मात्र यंदा ‘जेईई’ व ‘एमएचटी-सीईईटी’ला बसलेले विद्यार्थी व बारावीचा निकाल लक्षात घेता यंदा महाविद्यालयांना काहीसे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बारावीच्या परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत एकूण ५० टक्क्यांच्या वर गुण मिळालेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ जून आहे. यंदा विभागात बारावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस दिसून येण्याची चिन्हे आहेत.
यंदादेखील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन असेल. ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची ‘एफसी’मधून (फॅलिसिटेशन सेंटर) कागदपत्रांची पडताळणी करायला करणे अनिवार्य राहणार आहे.
‘पासवर्ड’ गोपनीय ठेवा
विद्यार्थ्यांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी केल्यानंतर त्यांचे ‘पासवर्ड’ घेऊन परस्पर प्रवेश निश्चित करण्याचे प्रकार झाल्याच्या तक्रारी मागील काही वर्षांत तंत्रशिक्षण संचालनालयाकडे आल्या होत्या. प्रवेशप्रक्रियेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये किंवा कोणी गैरफायदा उठवू नये यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या नोंदणीचा ‘पासवर्ड’ गोपनीय ठेवावा असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी केले आहे.
कशी असेल प्रक्रिया?
प्रवेशाची सर्व प्रक्रिया आॅनलाइन करण्यात आली आहे. अगदी अर्ज भरण्यापासून ते अर्ज निश्चिती आणि विकल्प अर्ज या सर्व गोष्टी आॅनलाइन करायच्या आहेत. अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा ३ प्रवेश फेºया असतील. पहिल्या, दुसºया फेरीसाठीच्या अर्जात पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. अखेरच्या फेरीत मात्र ‘कॉन्सिलिंग’द्वारे प्रक्रिया राबविली जाईल. पहिल्या व दुसºया फेरीत प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीतच प्रवेश घ्यावा लागेल. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पहिली प्राथमिक यादी १९ जून तर अंतिम यादी २२ जून रोजी ‘डीटीई’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे...
- बारावीची गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
वेळापत्रक...
आॅनलाइन अर्ज दाखल करणे५ जून ते १७ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी१९ जून
अंतिम गुणवत्ता यादी२२ जून
पहिल्या फेरीसाठी ‘आॅप्शन फॉर्म’२३ जून ते २६ जून
तात्पुरती वाटप यादी२८ जून
दुस-या फेरीसाठी ‘आॅप्शन फॉर्म’५ जुलै ते ८ जुलै
तात्पुरती वाटप यादी१० जुलै
तिस-या फेरीसाठी ‘आॅप्शन फॉर्म’१६ जुलै ते १९ जुलै
तात्पुरती वाटप यादी२१ जुलै