लोणावळ्याजवळ मुंबई-हैदराबाद एक्सप्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 17:12 IST2017-07-18T17:09:26+5:302017-07-18T17:12:11+5:30
खंडाळा घाटात मंकी हिल जवळ मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस या गाडीचे इंजिन रुळावरुन घसरल्याने दुर्घटना झाली आहे.

लोणावळ्याजवळ मुंबई-हैदराबाद एक्सप्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - खंडाळा घाटात मंकी हिल जवळ मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस या गाडीचे इंजिन रुळावरुन घसरले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या अपघातामुळे दीड तासांपासून मुंबईकडून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी लोकमतला दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार एक मोठा दगड घसरून रुळावर आला, तो इंजिनाला लागला आणि त्यामुळे इंजिनाचे चाक घसरले, पण कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस या गाडीचे इंजिन मंकी हिल येथे 3 : 30 वा. रुळावरुन खाली गेल्यामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.