एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार पण कन्या रोहिणी पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार?

By विलास बारी | Published: April 6, 2024 09:28 PM2024-04-06T21:28:27+5:302024-04-06T21:38:57+5:30

एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण सांगत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजपतील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.

Eknath Khadse will join BJP but daughter Rohini Khadse will remain in a Sharad pawar Party NCP ? | एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार पण कन्या रोहिणी पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार?

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार पण कन्या रोहिणी पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार?

जळगाव - भाजपत जाण्याचे तूर्तास प्रयोजन नाही, असे सांगणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याचे शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार एकनाथराव खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली व अनेक राजकीय विषयांवर त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी आमदार खडसे यांचा भाजपत प्रवेश झाल्याची चर्चा होती. मात्र, आमदार खडसे यांनी त्याबाबत स्पष्टपणे नकार दिला होता. मात्र, आता त्यांनी स्वत:च भाजपत प्रवेश करीत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील गौणखनिज प्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना १३७ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी हा निर्णय शासनाने रद्द केला. त्यानंतर भाजपकडून रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना आपण राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. मात्र, रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी घोषित केली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण सांगत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजपतील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.

खडसेंचा प्रवेश..? रोहिणी खडसे मात्र थांबणार राष्ट्रवादीत?
एकनाथ खडसेंसोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यादेखील भाजप प्रवेश करणार काय? याबाबत मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे या मुक्ताईनगर विधानसभेसाठी इच्छुक आहेत. पुढचे राजकारण सोयीचे जावे म्हणून राष्ट्रवादीतच राहणार की वडिलांसोबत भाजप प्रवेश करणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपतील प्रवेशाची बातमी खरी आहे. लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अजून प्रवेश झालेला नसल्यामुळे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. - एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट

खडसेंचा असा झाला प्रवास...

  • - १९९५-१९९९ युती सरकारच्या काळात मंत्रिपद
  • - २००९ ते २०१४ विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद
  • - जून २०१६ मध्ये भोसरी प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा
  • - २०१९ ला पक्षाने त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खडसे यांना विधानसभेचे तिकीट दिले, रोहिणी खडसेंचा पराभव
  • - २०२० मध्ये पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश
  • - २०२४ मध्ये ४ वर्षांनी पुन्हा स्वगृही परतणार

Web Title: Eknath Khadse will join BJP but daughter Rohini Khadse will remain in a Sharad pawar Party NCP ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.