दानवेंना काळे फासा पाच लाख मिळवा ! - राष्ट्रवादी युवक काँग्रेस

By Admin | Updated: May 12, 2017 17:59 IST2017-05-12T17:59:45+5:302017-05-12T17:59:45+5:30

शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले भाजपा नेते शेतकऱ्यांच्याच जीवावर उठले आहेत़ ऊठसुठ चेष्टा करीत आहेत, असा आरोप करीत लोहा-कंधारच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने खा़रावसाहेब

Demonna kale to get five million rupees! - Nationalist Youth Congress | दानवेंना काळे फासा पाच लाख मिळवा ! - राष्ट्रवादी युवक काँग्रेस

दानवेंना काळे फासा पाच लाख मिळवा ! - राष्ट्रवादी युवक काँग्रेस

ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 12 : शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले भाजपा नेते शेतकऱ्यांच्याच जीवावर उठले आहेत़ ऊठसुठ चेष्टा करीत आहेत, असा आरोप करीत लोहा-कंधारच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने खा़रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे़
ही अफलातून घोषणा करताना, राष्ट्रवादीचे माजी जि़प़उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी सांगितले, अन्नदाता व कष्टकऱ्यांबद्दल अभद्र भाषा वापरणाऱ्यांना रस्त्याने फिरु देणार नाही़ नांदेड जिल्ह्यातील जो कोणी कार्यकर्ता दानवे यांच्या तोंडाला काळे फासेल त्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर नागरी सत्कार करून दिले जाईल़ सत्तेची नशा आलेल्या नेत्यांना जनता धडा शिकवेल़ शेतकरी त्यांना घरचा रस्ता दाखवतील़ दरम्यान, दानवेंनी वापरलेली भाषा संतापजनक आहे़ केवळ दिलगिरी व्यक्त करुन चालणार नाही़ त्यांना त्यांच्या उद्दामपणाची शिक्षा मिळाली पाहिजे़ त्यांचे तोंड काळे झाले पाहिजे यासाठी बक्षीस जाहीर केल्याचा धोंडगे यांनी पुनरुच्चार केला़

Web Title: Demonna kale to get five million rupees! - Nationalist Youth Congress