मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू

By Admin | Updated: March 3, 2015 02:19 IST2015-03-03T02:19:33+5:302015-03-03T02:19:33+5:30

मालेगावमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी शब्बीर अहमद मसीउल्लाह (४२) याचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला,

Death of accused in Malegaon blast case | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू

मालेगाव (नाशिक) : मालेगावमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी शब्बीर अहमद मसीउल्लाह (४२) याचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला, तर शब्बीरच्या मुलगा महास अक्रम शब्बीर अहमद जखमी झाला आहे. बडा कबरस्तान येथे झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी शब्बीर एक आरोपी होता.
शब्बीर अहमदच्या राहत्या घराजवळ नूरबाग येथे त्याच्या अंगावर संरक्षक भिंत कोसळली. डोक्याला जबर मार लागल्याने त्याला उपचारार्थ सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शब्बीरवर मुंबई मोक्का कोर्टात खटला सुरू होता. (प्रतिनिधी)

Web Title: Death of accused in Malegaon blast case